विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव: विविध कार्यक्रमांचे नियोजन

Posted On: 16 JAN 2024 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024


भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 उद्यापासून सुरू होणार आहे. ह्या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, हा भव्य विज्ञान मेळा, 17 जानेवारीला सुरू होईल, तर 20 जानेवारी 2024 रोजी त्याची सांगता होईल. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशन ह्या स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने या नवव्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन आणि अंमलबजावणी करणार आहे. जैवतंत्रज्ञान विभाग (डी. बी. टी.) संस्थेचे प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र फरीदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ही या भव्य महोत्सवाची यजमान संस्था आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्वाच्या विषयात, भारताच्या कामगिरीचा, यशाचा उत्सव साजरा करणे हा या विज्ञान महोत्सवाचा उद्देश आहे. त्याशिवाय, विज्ञानप्रेमींच्या कामगिरीची दखल घेणे आणि युवा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे आणि भारतीय नागरिकांमध्ये त्याचा प्रसार करणे हा देखील महोत्सवाचा उद्देश आहे. राष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 ची मध्यवर्ती संकल्पना 'अमृतकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे” ही आहे.

यंदाच्या म्हणजेच, विज्ञान महोत्सव 2023 मध्ये 22 देश सहभागी होत आहेत. यात अर्जेंटिना, आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, केनिया, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, म्यानमार, नामिबिया, फिलीपिन्स, रवांडा, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड, अमेरिका, व्हिएतनाम आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सव 2023 च्या चारही दिवसांसाठी खालील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.:

यात विद्यार्थी विज्ञान गाव (सायन्स व्हीलेज), विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवे प्रयोग आणि शोध प्रत्यक्ष जाणून घेणे, खेळ आणि खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान, विद्यार्थी नवोन्मेष महोत्सव-स्पेस हॅकेथॉन, राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्र आणि राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव आणि अधिकारी यांची परिषद, आकांक्षी भारतासाठी शिक्षण-राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा, युवा शास्त्रज्ञ परिषद, नवीन युग तंत्रज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय सामाजिक संघटना आणि संस्थांची बैठक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शन, स्टार्ट-अप, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष बी टू बी मीट म्हणजे, व्यावसायिकांची परस्पर बैठक यांचा समावेश आहे.


S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1996651) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil