संरक्षण मंत्रालय
व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद यांनी नौदल संचालन महासंचालक म्हणून स्वीकारला पदभार
Posted On:
16 JAN 2024 3:39PM by PIB Mumbai
पणजी , 16 जानेवारी 2024
व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद यांनी नौदल संचालन महासंचालक म्हणून 15 जानेवारी 2024 रोजी पदभार स्वीकारला. ते गोव्यातील नौदल अकादमीच्या 38 व्या एकात्मिक कॅडेट अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असून भारतीय नौदलात 1 जुलै 1990 रोजी त्यांना नियुक्ती मिळाली.
ध्वज अधिकारी ए एन प्रमोद कॅट 'ए' सी किंग हवाई संचालन अधिकारी आणि संप्रेषण व इलेक्ट्रॉनिक्स रणनीतिज्ञ आहेत. डीएसएससी वेलिंग्टन (नीलगिरी )इथून त्यांनी स्टाफ कोर्स केला असून गोव्यातील नौदल अकादमीतून नौदल हायर कमांड कोर्स केला आहे.
त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण सागरी नियुक्तीमध्ये पश्चिम ताफ्यात फ्लीट ऑपेरेशन्स अधिकारी, भारतीय नौदलाच्या अभय, शार्दूल आणि सातपुडाचे प्रमुख, राजपूतचे कार्यकारी अधिकारी, सुजाताचे सिग्नल आणि कम्युनिकेशन अधिकारी, आयएनएस किरपानचे तोफखाना अधिकारी II, यांचा समावेश आहे. पोर्ट ब्लेअर येथे उत्क्रोश नौदल हवाई केंद्राचे ते प्रमुख होते आणि डीएसएससी वेलिंग्टन येथे संचालक स्टाफमध्येही ते होते. त्यांनी महत्त्वपूर्ण नियुक्तींवर काम केले असून त्यात सहसंचालक, नौदल हवाई स्टाफ आणि सहसंचालक, संचालक आणि प्रधान संचालक विमान अधिग्रहण, यांचा समावेश आहे. ते 2016-19 आणि 2006-09 या कालावधीत इंडियन स्ट्रॅटेजिक अँड ऑपरेशनल कौन्सिल (INSOC) आणि टॅक्टिकल ऑडिट ग्रुप (TAG) चे अनुक्रमे सदस्य होते.
ध्वज अधिकारी ए एन प्रमोद नौदल मुख्यालयात डेप्युटी कमांडंट,आयएनए, एसीएनएस (Air) या पदांवर काम केले असून ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी राहिले आहेत.

S.Tupe/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996635)
Visitor Counter : 74