वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात मुंबईतील राम मंदिराची स्वच्छता मोहीम
Posted On:
15 JAN 2024 8:30PM by PIB Mumbai
मुंबई, 15 जानेवारी 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईतील अंधेरी पूर्व येथील राम मंदिराची स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले. अयोध्येतील ‘प्राणप्रतिष्ठा’ दिनापूर्वी तीर्थक्षेत्रांची स्वच्छता करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जमलेल्या लोकांना प्रार्थनास्थळे स्वच्छ करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्मरण करून दिले. स्वतः पंतप्रधान कसे कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेने नाशिकमध्ये स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी दाखविलेल्या वचनबद्धतेने देशातील प्रत्येक नागरिकाने तीर्थक्षेत्रांची स्वच्छता करावी, असे आवाहन त्यांनी केले.
देशवासीयांना प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या प्रदूषणाबाबत सावध करण्याची संधीही मंत्र्यांनी साधली. स्वच्छता ही एक सामाजिक जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील प्रत्येक तीर्थक्षेत्र स्वच्छ करणे आणि ते स्वच्छ ठेवण्याचे सुनिश्चित करण्यासाठी झटणे हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निदर्शनास आणून दिले.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996399)
Visitor Counter : 95