संरक्षण मंत्रालय
त्रि-सेवा सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त अभिवादन
Posted On:
15 JAN 2024 3:43PM by PIB Mumbai
मुंबई , 15 जानेवारी 2024
8 व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त, 14 जानेवारी 24 रोजी नौदल गोदीमधील गौरव स्तंभ येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी सैनिकांना अभिवादन करण्यात आले. पश्चिम नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग इन चीफ व्हाइस ॲडमिरल संजय जे सिंह , महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल एचएस काहलॉन , सागरी हवाई संचालनाचे एओसी एव्हीएम रजत मोहन, महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी रिअर ॲडमिरल मनीष चड्ढा आणि माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.
कर्तव्य आणि राष्ट्र उभारणीत सशस्त्र दलांच्या उत्कृष्ट परंपरांना अधोरेखित करत अनेक शूरवीरांच्या शौर्य, धैर्य, समर्पण आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
S.Kakade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996241)
Visitor Counter : 102