युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा महोत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक नृत्यांनी जिंकली युवकांची मने
Posted On:
13 JAN 2024 9:16PM by PIB Mumbai
नाशिक शहरात होत असलेल्या २७ व्या युवा राष्ट्रीय महोत्सवच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१३) विविध ठिकाणी कार्यक्रम झाले. महायुवा ग्राम हनुमान नगर मध्ये सुविचार कार्यक्रमचे उदघाटन केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयचे जॉइंट सेक्रेटरी नितेश कुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते.
सुविचार कार्यक्रमच्या पहिल्या सत्रात नाशिकचे सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे, दुसऱ्या सत्रात रॅम्प माय सिटीचे चेअरमन प्रतीक खंडेलवाल यांनी युवकांशी चर्चा केली. त्यांनी युवकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा तसेच अडचणीत हार मानू नये, असे महत्वपूर्ण संदेश दिला.
रावसाहेब थोरात सभागृहात लोकगीत ग्रुप व सोलो परफॉर्मसचा कार्यक्रम झाला. या सभागृहात कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, लदाख, हरियाणा, छत्तीसगढ़, दिल्ली, गुजरात व गोवा येथून आलेल्य कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. तसेच, महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये लोकनृत्य ग्रुप व सोलो कार्यक्रम झाला. तेथे काही राज्यातील कलाकारांनी सांस्कृतिक नृत्य सादर करून तरुणांचे मनोरंजन केले. देशभरातून आलेल्या कलाकारांनी उदोजी महाराज संग्रहालयामध्ये आपल्या हस्तकलेच्या प्रदर्शनात पोस्टर बनवले व गोष्टी लिहिल्या. महायुवा ग्राम हनुमान नगरमध्ये डोम बनवले आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शने आयोजित केली जात आहे. खेळाडूंनी स्वदेशी खेळात सहभाग घेतला. युवाशक्तीचा उद्योग क्षेत्रातील जागर युवकांची अनुभवला. महाएक्सपोच्या माध्यमातून युवकांनी केलेल्या मशीन्स, ई-बाइक, कृषी उपकरण यांचे प्रदर्शनांनी युवकांची मने जिंकली.
युवाकृतिच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यातील घरगुती सामानांचे प्रदर्शन लागले आहेत. या कार्यक्रमात युवकांची गर्दी झाली होती. शनिवारी संध्याकांळी स्टेट बस नामक म्यूजिक बँडने युवकामध्ये जोश भरला होता. तसेच गीत-संगीतने राष्ट्रीय युवा महोत्सवमध्ये रंग भरला. युवाग्राम मैदानावर आयोजित फ़ूड फेस्टिवलमध्ये देशभरातून आलेल्या विविध राज्यांचे खाद्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचा आस्वाद युवकांनी घेतला.
केंद्रीय राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांनी सगळ्या आयोजित ठिकाणाचा दौरा केला.
***
H.Akude/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995920)
Visitor Counter : 122