शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेद्वारे (एनआयओएस) ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये सरकारी परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क वसुलीचे वेळापत्रक जारी

Posted On: 09 JAN 2024 8:07PM by PIB Mumbai

मुंबई, 9 जानेवारी 2024

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस), अर्थात राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान, वर्षातून दोनदा एनआयओएस मुख्यालयाने निश्चित केलेल्या तारखांना  सरकारी स्तरावरील परीक्षा आयोजित करते.

ऑक्‍टोबर/नोव्‍हेंबर 2023 परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्‍यांच्या, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या, आगामी म्हणजेच एप्रिल-मे मध्ये होणार्‍या सरकारी परीक्षेच्या शुल्क संकलनाची नोंदणी पुढील प्रमाणे नियोजित करण्यात आली आहे:

1.

For all registered learners of October/November, 2023 Examination

Without late fee

11th January to 20th January, 2024

2.

With Late Fee of Rs. 100/- per Subject

21st January to 25th January, 2024

3.

With consolidated late fee of Rs. 1500/- per learner

26th January to 30th January, 2024

 

वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, ब्लॉक/सत्र आणि माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या वर्षापासून दोन वर्षांचे अंतर सुनिश्चित करणे बंधनकारक आहे. जर विद्यार्थ्यानी दोन वर्षांचे आवश्यक अंतर ठेवले नसेल, तर त्याने/तिने आगामी एप्रिल/मे 2024 परीक्षांसाठी जास्तीत जास्त चार विषयांची (यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विषयांसह) नोंदणी करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करताना ही गोष्ट लक्षात घेऊन विषयांची निवड काळजीपूर्वक करावी. परीक्षा शुल्क एनआयओएस (NIOS) च्या पुढील वेबसाइटवर केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येईल:

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994654) Visitor Counter : 80


Read this release in: English