दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल कार्यालयाची फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट 1 फेब्रुवारी 2024 पासून नवीन फ्रँचायझी योजना सुरू करणार


इंडिया पोस्ट 'क्लिक एन बुक' सेवा महाराष्ट्रातील 141 टपाल कार्यालयात उपलब्ध

इंडिया पोस्ट अन्वित सेवा मुंबईतील प्रमुख ठिकाणी सुरू होणार

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे कार्यान्वित

Posted On: 08 JAN 2024 9:54PM by PIB Mumbai

मुंबई, 8 जानेवारी 2024


इंडिया पोस्ट हे 89% ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांसह 1.55 लाखाहून अधिक टपाल कार्यालये असणारे आणि सातत्याने टपाल कार्यालयांची मागणी असणारे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. तरीही ग्राहकांकडून विशेषत: नव्याने विकसित होत असलेल्या शहरी समूहांमध्ये आणखी टपाल कार्यालये उघडण्याची मागणी ग्राहकांकडून निरंतर होत आहे. याची पूर्तता करण्यासाठी, पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट नवीन फ्रँचायझी योजना 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे.

विक्रयाधिकार केंद्र (फ्रँचायझी आउटलेटद्वारे) काय दिले जाऊ शकते?

अंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग नॉन-सीओडी (कागदपत्रे आणि पार्सल), अंतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर

टपाल तिकीट आणि लेखनसाहित्याची विक्री

रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भर्ती शुल्क स्टॅम्प इ.सह किरकोळ सेवा.

पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे आणि प्रिमियम संकलनासह संबंधित विक्रीपश्चात  सेवा प्रदान करणे.

फ्रँचायझी कसे बनावे?

फ्रँचायझीसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. व्यक्ती तसेच संस्था/संघटना/इतर संस्था जसे कोपऱ्यावरील दुकान, पानवाला, किराणावाला, लेखनसाहित्याची दुकाने, छोटे दुकानदार इ.

वय: 18 वर्षांपेक्षा जास्त. उत्पादनांच्या श्रेणीचे व्यवस्थापन आणि विपणन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.

व्यक्ती/संस्था भारतीय डाकसोबत करार करेल.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण. स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली; संगणक साक्षर; स्मार्ट फोन वापराबाबत परिचित; वैध पॅन क्रमांक असलेली व्यक्ती फ्रँचायझी होण्यासाठी अर्ज करू शकते.

अर्जदाराला टपाल कार्यालयात सुरक्षा ठेव म्हणून रुपये 10,000/- जमा करावे लागतील.

फ्रँचायझीसाठी कमिशन:

फ्रँचायझींना प्रत्येक रजिस्टर पत्रासाठी 3.00 रु,  200/- पेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनी ऑर्डरसाठी 5.00 रुपये, टपाल तिकीट आणि लेखनसाहित्य विक्रीवर 5% कमिशन मिळेल. बुक केलेल्या स्पीड पोस्ट लेखासाठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रँचायझी त्याने केलेल्या मासिक व्यवसायाच्या 7% ते 25% कमिशन मिळवेल.

निवड निकष:

टपाल विभागीय प्रमुख हे फ्रँचायझीला संलग्न करण्यासाठी सक्षम अधिकारी असतील.

इंडिया पोस्टने 'क्लिक एन बुक' सेवा देखील सुरू केली आहे, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म जो ग्राहकांना स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्रे आणि पार्सल बुक करण्यास अनुमती देतो. सध्या ही सेवा महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या 141 टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टपाल विभागाच्या https://www.indiapost.gov.in/Help/Pages/ClicknBook_individuals.aspx या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. यासाठी फक्त  50/- रुपये पिकअप शुल्क आकारणी केली जाईल. ही  सुविधा 500/- रुपये  पेक्षा जास्त शुल्क असलेल्या वस्तूंसाठी   पिकअप सेवा मोफत प्रदान केली जाईल. यासाठी डीओपीने अधिकृत केलेल्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करावे लागेल.

जे लोक त्यांच्या वस्तूंच्या बुकिंगसाठी नियमित कामकाजाच्या वेळेत पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकत नाहीत  अशा ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल .

स्मार्ट आणि डिजिटल पार्सल वितरण प्रणाली (एएनव्हीआयटी सेवा) पार्सल वितरणात एक क्रांती घडवून आणत आहे. ही स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल परिसरातून कधीही (24/7) पार्सल/वस्तू गोळा करण्यासाठी आखली गेली आहे. या उच्च-तंत्र असलेल्या सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली द्वारे लोकांना कोणत्याही खर्चाशिवाय त्यांच्या पार्सलची ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान केली जाईल. ही सेवा सध्या ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुणे  शहरातील इन्फोटेक पार्क सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. एएनव्हीआयटी सेवा मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील आणखी 5 ठिकाणी सुरु केली जाणार असून ही सेवा नवीन क्षितिजांवर आपले पंख पसरवण्यासाठी सज्ज आहे.

निर्यात उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि निर्यात संबंधी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच निर्यातदारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागाने महाराष्ट्र राज्य आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) सुरू केली आहेत. पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई),  सीमाशुल्क क्लियरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली पुरवल्या जात आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) कार्यान्वित झाली आहेत.


S.Patil/Vasanti/Gajendra/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1994370) Visitor Counter : 202


Read this release in: English