वस्त्रोद्योग मंत्रालय
मानवनिर्मित आणि तांत्रिक वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद(MATEXIL) वस्त्रोद्योग क्षेत्राला आपली उत्पादकता 250 अब्ज डॉलर पर्यंत दुपटीने वाढवण्यासाठी मदत करेल- पीयूष गोयल
वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योगांना विविध श्रेणींमध्ये मॅटेक्सिल निर्यात पुरस्कार 2022-23 चे वितरण
Posted On:
04 JAN 2024 8:40PM by PIB Mumbai
मुंबई, 4 जानेवारी 2024
गेल्या 70 वर्षात एक नवोदित असण्यापासून ते 150 पेक्षा जास्त देशांचा निर्यातदार बनण्यापर्यंत मॅटेक्सिलने प्रचंड प्रमाणात कार्य केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. ते आज मानवनिर्मित आणि तांत्रिक वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद(MATEXIL)ने आयोजित केलेल्या 2022-23 या वर्षाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. 2022-23 या वर्षासाठी राकेश मेहरा यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला. वस्त्रोद्योग श्रेणीत महिला उद्योजक हा पुरस्कार नेहा झुनझुनवाला यांना प्राप्त झाला. व्हीजेटीआयच्या डॉ. नेहा मेहरा आणि टीमला वस्त्र अभियांत्रिकीमधील पुरस्कार देण्यात आला. अधिक तपशीलासाठी कृपया तळाशी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
M9IX.jpeg)
यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, “ वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये कधीही हार न मानण्याची वृत्ती आहे. भविष्यात हे क्षेत्र कुठे असेल अशा प्रकारच्या चिंतांपासून वस्रोद्योग क्षेत्राने अगदी कोविडसारख्या आव्हानांमधूनही बाहेर पडून एक भक्कम क्षेत्र म्हणून हे क्षेत्र उदयाला आले आहे. अगदी ज्यावेळी आपल्याला दोन युद्धांचा अनुभव येत आहे आणि सागरी मार्गांमध्ये बंडखोरांचा त्रास सुरू आहे, अशा वेळी देखील हे क्षेत्र हार मानायला तयार नाही,” असे ते म्हणाले.
गोयल पुढे म्हणाले की, “ भारतातील तांत्रिक क्षेत्र जगाच्या कल्पनेनुसार आकार घेण्याचा प्रयत्न करत आहे. तांत्रिक आणि मानव निर्मित धाग्यांमध्ये जागतिक व्यापाराच्या 70 टक्के उलाढाल होत आहे.”

भारत टेक्समध्ये खाजगी उद्योगांच्या योगदानाची गोयल यांनी प्रशंसा केली. वस्त्रोद्योग क्षेत्राला आपली उत्पादकता 250 अब्ज डॉलरपर्यंत दुप्पट करण्यात मॅटेक्सिल मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार, भारत टेक्स वगळता इतर कुठेही फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन म्हणजेच शेतातून उत्पादित कापसापासून वस्त्र बनवण्यापासून कारखान्यात कापड तयार करून विविध फॅशनचे कपडे बनवण्यापासून ते परदेशात पाठ्वण्यापर्यंत अशाप्रकारची सुविधा नाही."प्रत्येकाने भारतीय उत्पादकांना पाठबळ दिले पाहिजे आणि आणि त्यांचे महत्व लक्षात घेतले पाहिजे, जर त्यांचे या दीर्घकालीन उद्योगात नुकसान झाले तर त्याचा उद्योगाला मोठ्या प्रमाणावर त्रास होईल.", असे मंत्री म्हणाले.

प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक सहकार्यामधून (आरसीईपी) मधून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधानांनी उचललेल्या कठोर पावलाचे त्यांनी कौतुक केले.सक्रिय औषोधोत्पादन घटकांच्या (एपीआय) कमतरतेमुळे कोविड काळात त्रस्त झालेल्या औषोधोत्पादन उद्योगाचे त्यांनी उदाहरण दिले.आणि भारताने आता भारतातच एपीआयच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक खरेदी आणि स्थानिक मूल्यवर्धनाला पाठबळ देण्याचे आवाहन गोयल यांनी उद्योजकांना केले. कंपन्यांनी स्वेच्छेने उत्पादनातील देशांतर्गत सामग्री घोषित करण्याची कल्पना त्यांनी मांडली, "यामुळे आपल्याला अंतिम उत्पादनाच्या मूल्य साखळीची कल्पना येईल", असे ते म्हणाले.

वस्त्रोद्योग क्षेत्रातील खाजगी कंपन्यांनी संशोधनातील विकासावर कमी खर्च केल्याबद्दल गोयल यांनी निराशा व्यक्त केली . संशोधन आणि विकासात सरकारचेच केवळ योगदान आहे असे सांगत खाजगी क्षेत्राने संशोधन आणि विकासावरील खर्च वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. खाजगी क्षेत्राद्वारे जे कौशल्य विकसित केले जाऊ शकते त्याची बरोबरी सरकार करू शकत नाही.असे सांगत त्यांनी खाजगी क्षेत्राला कौशल्य विकासासाठी प्रयत्नांना गती देण्याचे आवाहन केले .
कस्तुरी कापसाचे उत्पादन सुरू करण्यासाठी कोणत्या विक्रमी गतीने यासाठीच्या व्यवस्थेची उभारणी करण्यात आली याचे उदाहरण गोयल यांनी दिले. यावेळी धीरज शहा, निमंत्रक, निर्यात पुरस्कार समिती एसआरटीईपीसी आणि एसआरटीईपीसीचे अध्यक्ष भद्रेश दोडिया आणि वस्त्र उद्योजक उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | S.Kane/Shailesh P/Sonal C/D.Rane
(Release ID: 1993250)
Visitor Counter : 98