संरक्षण मंत्रालय
पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात तिसऱ्या संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूचीचे प्रकाशन
Posted On:
03 JAN 2024 5:48PM by PIB Mumbai
पुणे, 3 जानेवारी 2024
एव्हीएसएम, वायएसएम,एसएम, व्हीएसएम, जीओसी -इन-सी लेफ्टनंट जनरल एके सिंग आणि एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांच्या हस्ते आज, म्हणजेच, 03 जानेवारी 2024 रोजी पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली. ही सूची म्हणजे देशातील 650 उत्पादकांच्या माहितीचा कोष आहे. सदर सूचीची ही तिसरी आवृत्ती असून ती छापील आणि ई-फॉर्मॅट अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे.
एमसीसीआयए अर्थात महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग आणि कृषी मंडळाने ही मार्गदर्शक सूची तयार केली आहे. एमसीसीआयए ही 3000 हून अधिक सदस्य संख्या असलेली 89 वर्ष जुनी व्यवसाय प्रोत्साहन संस्था असून ती सर्व आवश्यक पाठबळात्मक सुविधांसह उपयुक्त आणि सहकार्यात्मक मंच उपलब्ध करुन देते.
हा उपक्रम संरक्षण सामग्री उत्पादक उद्योगांपर्यंत अधिक सहजतेने पोहोचणे आणि हे उद्योग सुलभतेने दृश्यमान होणे शक्य करत, त्यायोगे ‘आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न, दर्जेदार उत्पादने आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उत्पादनांची जाहिरात यांच्या समन्वयीत वापर सुनिश्चित करेल.

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992826)
Visitor Counter : 81