वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ठाणे येथे डीजीएफटीच्या वतीने ई-वाणिज्य निर्यात, परकीय व्यापार धोरण, पॅकेजिंग, पेमेंट्स आणि बँकिंग यावर क्षमता बांधणी कार्यक्रम
Posted On:
29 DEC 2023 7:00PM by PIB Mumbai
मुंबई, 29 डिसेंबर 2023
ठाणे, महाराष्ट्र इथे आज (29.12.2023) परकीय व्यापार, मुंबईच्या अतिरिक्त महासंचालक कार्यालयाने ई-वाणिज्य निर्यात, परकीय व्यापार धोरण, पॅकेजिंग, पेमेंट्स आणि बँकिंग यावर क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित केला होता. ठाणे हे वस्त्र प्रावरण, औद्योगिक उत्पादने , औषधोत्पादन आणि विविध प्रकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) यांसारख्या क्षेत्रातील उद्योगांसह एक समृद्ध औद्योगिक केंद्र आहे. हा कार्यक्रम इंडिया पोस्ट, एमएसएमई मंत्रालय, ठाणे लघुउद्योग संघटना (टीएसएसएसआयए ), लघु उद्योग संघटना (सीओएसआयए ), आयसीआयसीआय बँक आणि रिव्हेक्सा या बी 2बी ई-वाणिज्य मंचाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सुमारे 100 निर्यातदार/उद्योजक/लघु उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते.
परकीय व्यापार विभागाचे अतिरिक्त महासंचालक, मुंबई यांनी इंटरनेटद्वारे उपलब्ध केलेल्या नवीन माध्यमांद्वारे स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या गरजेवर भर दिला. परकीय व्यापार धोरण 2023 अंतर्गत आगाऊ प्रमाणीकरण आणि निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू (ईपीसीजी ) योजना अंतर्गत शुल्क तटस्थीकरण उपलब्ध आहे. आणि ई-वाणिज्य निर्यातीवर भारत सरकारचा जोर देखील स्पष्ट करण्यात आला.ई-वाणिज्य निर्यातीसाठी डाक निर्यात केंद्रे (डीएनके ) उपक्रमावर इंडिया पोस्टचे एक सत्र घेण्यात आले. भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या (आयआयपी ) एका सत्रात श्रोत्यांना ई-वाणिज्य निर्यातीसाठी पॅकेजिंगच्या गरजांबद्दल माहिती दिली.
सूक्ष्म आणि लघु उद्योग उद्योग-समूह विकास कार्यक्रम (एमएसई-सीडीपी), देशांतर्गत/आंतरराष्ट्रीय मेळ्यांमधील सहभागासाठी निधी, व्यवसाय इनक्यूबेटर धोरण, पारंपारिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी निधीची योजना (स्फूर्ती ) यासारख्या एमएसएमई मंत्रालयाद्वारे लागू केलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.
बँकिंग संबंधित नियम आणि आवश्यक अनुपालने आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली, ज्यात ई-वाणिज्य निर्यातीसाठी देयके संबंधित समस्या समाविष्ट आहेत. रिव्हेक्सच्या सत्रात निर्यातदारांना ई-वाणिज्य द्वारे ऑनबोर्डिंग, व्यवहार आणि पूर्तता करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.
परकीय व्यापार अतिरिक्त महासंचालकांचे कार्यालय उद्योग संघटना, औद्योगिक समूह यांच्याशी सतत सहकार्य आणि समन्वय साधण्यासाठी सज्ज आहे. यामुळे उद्योगांना आवश्यक असलेल्या ठिकाणी असे क्षमता वाढवणारे कार्यक्रम आणि आउटरीच सत्रे आयोजित केली जातात आणि ई-वाणिज्य निर्यातीची क्षमता लक्षात येते.


S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1991603)
Visitor Counter : 102