ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्टोबर 2023 पर्यंत, 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी अधिसूचित केली ‘द एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड’ ही उर्जासंवर्धन स्नेही इमारत संहिता : केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री

प्रविष्टि तिथि: 23 DEC 2023 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 23 डिसेंबर 2023

सध्या एकूण विजेच्या वापरापैकी सुमारे 33% वापर, व्यावसायिक आणि निवासी श्रेणीतील ग्राहकांकडून होतो अशी माहिती, केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी दिली आहे. पुढील वीस वर्षांत विविध श्रेणीनुसार होणाऱ्या वीज वापराबाबत अंदाज व्यक्त केलेला नसला, तरी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने तयार केलेल्या विसाव्या विद्युत उर्जा सर्वेक्षण अहवालानुसार, 2031-32 वर्षापर्यंत व्यावसायिक आणि निवासी श्रेणीतील ग्राहकांच्या विजेचा एकत्रित वापर, एकूण वीजवापराच्या 40% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऊर्जेचा वापर कमी होईल अशा वैशिष्ट्यांनी युक्त नवीन व्यावसायिक इमारती बांधल्या जाव्यात या उद्देशाने, ऊर्जासंवर्धन स्नेही इमारत संहिता विकसित करण्यात आली आहे. ऊर्जासंवर्धन स्नेही संहितेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत, 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या राज्यांमध्ये ही संहिता अधिसूचित केली होती.

केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री  आर के सिंह यांनी 21 डिसेंबर 2023 रोजी, लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 


M.Pange/A.Save/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 1989895) आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu