दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पणजी येथे 26 डिसेंबर रोजी गोवा विभागीय स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन


तक्रार दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 22 डिसेंबर

Posted On: 20 DEC 2023 7:10PM by PIB Mumbai

गोवा, 20 डिसेंबर 2023

 

पणजी येथील गोवा क्षेत्र टपाल विभागाचे पोस्टमास्टर जनरल यांच्या वतीने 26.12.2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पोस्टमास्टर जनरल कार्यालय, पट्टो प्लाझा, पणजी येथे 56 वे  प्रादेशिक स्तरावरील डाक अदालत आयोजित केले  जाणार आहे.

गोवा विभागाशी संबंधित टपाल सेवांसंबंधीच्या तक्रारी, ज्यांचा दाखल केल्यापासून सहा आठवड्यांच्या आत निपटारा झाला नाही अशा तक्रारी या डाक अदालतमध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत.

मेल, स्पीड पोस्ट, खिडकी सेवा, बचत बँका आणि पोहोचल्या नाहीत अशा मनी ऑर्डर  यासंबंधीच्या तक्रारींचा विचार अदालतीत केला जाईल. दाखल केलेल्या तक्रारींमध्ये ज्या अधिकार्‍यांकडे मूळ तक्रार करण्यात आली त्यांच्या तारखा, नावे आणि त्या अधिकाऱ्याचे पदनाम यांसारखे तपशील असले पाहिजेत.

इच्छुक ग्राहक, ‘सहाय्यक संचालक पोस्टल सर्व्हिसेस-I, O/o पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001’ या पत्त्यावर टपाल सेवांसंबंधीच्या तक्रारी सादर करू शकतात. तक्रार दाखल करण्याची अंतिम तारीख 22.12.2023 आहे.

टपाल विभागाची सेवा देशाच्या सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली असून ही सेवा आभासी रुपाने प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करते. टपाल विभाग आपल्या ग्राहकांचे पूर्ण समाधान होईल अशा सेवा पुरविण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करत असताना संप्रेषणातील तफावत आणि सेवा दोष अधूनमधून घडतात आणि त्यामुळे तक्रारी वाढतात यांची टपाल विभागाला जाण आहे.  अशा तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, टपाल विभाग वेळोवेळी अदालतीतेचे आयोजन करतो. या अदालतीत विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींचा तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

 

* * *

PIB Panaji | S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988860) अभ्यागत कक्ष : 92
Read this releasein: English