पर्यटन मंत्रालय
प्रशाद आणि स्वदेश दर्शन योजनेंतर्गत महाराष्ट्रातल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार – केंद्रीय पर्यटन मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांची लोकसभेत माहिती
Posted On:
18 DEC 2023 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 18 डिसेंबर 2023
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभरात आता पर्यंत प्रशाद योजनेंतर्गत 46 परियोजना आणि स्वदेश दर्शन अंतर्गत एकूण 76 परियोजना स्वीकृत करण्यात आल्या आहेत , ज्यात धार्मिक स्थळांचा समावेश आहे. याशिवाय या दोन योजनांतर्गत विकास करण्यासाठी नवीन स्थळे निश्चीत केली आहेत. महाराष्ट्रात विकासासाठी निश्चित केलेल्या परीयोजनाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
- प्रशाद योजनेत नाशिक जिल्ह्यातल्या त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्राच 52.92 कोटींचा निधी खर्च करून विकास करण्यात येणार आहे.
- स्वदेश दर्शन योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरेश्वर, तरकर्ली, विजयदुर्ग येथील चौपाटी आणि खाडी किनार्यांचा 19.06 कोटींचा निधी खर्च्कारून विकास करण्यात येणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातल्या वाकी - अडासा - धापेवाडा - परादसिंघा - तेलंखंडी- गिराड यांचा 53.96 कितींचा निधी खर्चून विकास करण्यात येणार आहे. याशिवाय प्रशाद योजनेंतर्गत नवीन परीयोजनेत औरंगाबाद येथील श्री गुरूसनेश्वर शिवालय, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर येथील श्रीक्षेत्र राजूर, जालना येथील गणपति मंदिर यांचा तर स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत सिंधू दुर्गचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत हि माहिती दिली. या संबधीचा प्रश्न श्री. हेमंत पाटील यांनी विचारला होता .
पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियानात (प्रशाद) तथा ‘स्वदेश दर्शन’ (एसडी) योजने अंतर्गत देशभरातील धार्मिक स्थळासह पर्यटन क्षेत्राचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्राशाशित प्रदेशांना आर्थिक सहाय देण्यात येते.
* * *
(पसूका, प्रेस नोट) | PIB Mumbai | NM/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1987856)
Visitor Counter : 102