विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
एनआयओ अर्थात राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था सोमवारी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या 9 व्या पर्वाचे करणार आयोजन
Posted On:
16 DEC 2023 2:33PM by PIB Mumbai
पणजी, 16 डिसेंबर 2023
सीएसआयआर - राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था सोमवारी 18 डिसेंबर 2023 रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ-गोवा) च्या 9 व्या पर्वाचे संस्थेच्या परिसरात आयोजन करणार आहे. सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे 100 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या वर्षीच्या पर्वाची संकल्पना आहे ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी- पब्लिक आऊटरीच इन अमृत काल. विज्ञानाविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्याबरोबरच विज्ञानाविषयी रुची बाळगणाऱ्या व्यक्तींना विशेषत: विद्यार्थी, शिक्षक यांसारख्या विविध स्तरावरील व्यक्तींना प्रेरणा मिळावी आणि लोकांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण हवी तसेच त्यांना विविध वैज्ञानिक संशोधनाविषयी माहिती मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे उद्दिष्ट आहे.
सीएसआयआर- एनआयओ च्या या कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थी सागरी संशोधनातील नवीनतम घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनीला भेट देतील. त्याचबरोबर विद्यार्थी विविध वैज्ञानिक विषयांवरील चर्चासत्रात आणि चित्र प्रदर्शनामध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर वैज्ञानिकांशी देखील संवाद साधतील.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव -गोवा चे आयोजन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान आणि विज्ञान परिषद- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून संस्थेला युवकांमध्ये आपल्या काही वैज्ञानिक आणि तांत्रिक कामगिरीचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन मिळते. युवकांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे तसेच विज्ञानाविषयी माहिती देणे हेच या एकंदरीत सामूहिक प्रसार कार्याचे उद्दिष्ट आहे.
समृद्ध भारताच्या प्रगतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सर्जनशीलता वाढवण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव समर्पित आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि भूविज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम जनतेसाठी खुला आहे.
***
S.Kane/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987163)
Visitor Counter : 108