ऊर्जा मंत्रालय

कोणत्याही व्यवसायाचे केवळ आर्थिक फायदेच नाही तर पर्यावरणीय आणि सामाजिक फायदेही असले पाहिजेत : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 2023 निमित्ताने राष्ट्रपतींचे प्रतिपादन


राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि ऊर्जा संवर्धनावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

Posted On: 14 DEC 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 2023 निमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार 2023 आणि ऊर्जा संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 2023 च्या विजेत्यांचा सत्कार देखील केला.

राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्यांचे आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे ऊर्जा कार्यक्षमतेच्या संदेशाचा प्रचार केल्याबद्दल कौतुक केले. सरकार, उद्योग, नागरी समाज आणि शालेय मुलांचा समावेश असलेल्या या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रपतींनी निसर्गाचे संवर्धन आणि चांगले आरोग्य यामध्येच आपल्या सर्वांचे आरोग्य आणि आनंद सामावलेला आहे असे सांगितले. जर आपण उपलब्ध संसाधनांचा वाजवी स्वरुपात वापर केला तर प्रत्येकाची ऊर्जेची आणि इतर गरजा निसर्ग आणि भू मातेवर अनावश्यक दबाव न पडता पूर्ण होतील, असे त्या म्हणाल्या. वाजवी स्वरुपातील वापरासोबतच सर्व हितधारकांनी ऊर्जा कार्यक्षमता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. ऊर्जा बचतीचे उपाय मोठ्या प्रमाणात अमलात आणावे लागतील, असे त्यांनी सांगितले. ऊर्जा बचत म्हणजे ऊर्जा उत्पादन – हा संदेश अत्यंत उपयुक्त आहे हे त्यांनी अधोरेखित केले. हा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

21 व्या शतकात ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी जागतिक समुदायाने सतत सक्रिय राहाणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.  आपण पवन, सौर तसेच लहान आणि सूक्ष्म जलविद्युत निर्मिती प्रकल्पांतून होणाऱ्या वीज उत्पादनाचे प्रमाण वाढवले पाहिजे. नवीकरणीय उर्जेचा अधिक प्रमाणात वापर करण्यासोबतच आपण कमी साधनसंपत्तीचा वापर करून अधिक प्रमाणात उर्जानिर्मिती करण्याच्या दिशेने देखील प्रयत्न केले पाहिजेत.आपण आपल्या शाश्वतताविषयक प्रयत्नांमध्ये तिहेरी पाया सूत्राच्या संकल्पनेसह पुढे वाटचाल केली पाहिजे असे त्या पुढे म्हणाल्या. कोणत्याही व्यवसायाचे केवळ आर्थिक फायदेच नाहीत , तर  पर्यावरणीय आणि सामाजिक लाभ देखील मिळायला हवे, असे त्या म्हणाल्या.  

भारताने स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात नेहमीच एक जबाबदार देश म्हणून काम केले आहे, राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

केंद्रीय विद्युत आणि नवीन तसेच नूतनीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंह  म्हणाले की उद्योग क्षेत्र तसेच इतर भागधारकांचे समर्पित प्रयत्न देशातील उर्जा संवर्धन चळवळ पुढे घेऊन जात आहेत.  बीईई म्हणजेच उर्जा कार्यक्षमता मंडळाने राबवलेले परफॉर्म अचिव्ह ट्रेड आणि स्टार लेबलिंग कार्यक्रम यांसारखे उपक्रम जगासाठी मार्गदर्शक असून हे उपक्रम कार्बन उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी करण्यात यश मिळवून देत आहेत आणि भारताला हवामान विषयक कृतीची उद्दिष्ट्ये साध्य करण्यात मदत करत आहेत, असे सिंह यांनी सांगितले. वर्ष 2030 पर्यंत देशातील एकूण उर्जा निर्मितीच्या  65% उर्जा बिगर जीवाश्म इंधनापासून मिळवण्यात यश मिळाले असेल.

राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार 2023 (एनईसीए 2023)

समाजात उर्जा परिणामकारकता आणि उर्जेचे संवर्धन यांच्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बीईई ही संस्था औद्योगिक एकके, संस्था तसेच आस्थापना यांच्यातर्फे केल्या जात असलेल्या उर्जा वापर कमी करण्याबाबतच्या प्रयत्नांचा गौरव करून राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनी त्यांना उर्जा संवर्धन पुरस्कार देऊन प्रोत्साहन देते.

एनईसीए 2023 अंतर्गत यावर्षी प्रथम क्रमांकाची 20 पारितोषिके, द्वितीय क्रमांकाची 16 पारितोषिके तसेच 27 गुणवत्ता प्रमाणपत्रे अशी एकूण 63 पारितोषिके देण्यात येत आहेत.

The full list of winners of NECA 2023 is given here.

The full list of winners of NEEIA 2023 is given here.

The full list of winners of National Level Painting Competition on Energy Conservation 2023 is given here.

 

* * *

S.Kakade/Shraddha/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986482) Visitor Counter : 82


Read this release in: English , Hindi