अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

गुणवत्ता राखून कांद्याचा साठवणूक कालावधी वाढवण्यासाठी बीएआरसीकडून ‘एकात्मिक कार्यप्रणाली’ विकसित


कांद्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी, काढणीनंतरचे नुकसान प्रभावीपणे नियंत्रित करण्यात आणि कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत करण्यासाठी अभिनव प्रयोग

Posted On: 13 DEC 2023 5:40PM by PIB Mumbai

मुंबई, 13 डिसेंबर 2023

 

गुणवत्ता कायम राखून कांद्याचा साठवणूक कालावधी  वाढवण्यासाठी अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या  बीआरसी म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्राच्या बहु-शाखीय संशोधन आणि विकास  युनिटने  एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी, विशिष्ट कालावधीत तुटवड्याच्या  सततच्या आव्हानांवर मात करण्यासाठी , सडणे, कोंब फुटणे आणि वजन कमी होणे परिणामी काढणीनंतरचे लक्षणीय नुकसान आणि बाजारभावातील चढ-उतार या  समस्यांवर  मात करण्यासाठी  बीआरसीने ‘एकात्मिक कार्यप्रणाली’ विकसित केली आहे.

बीएआरसीने विकिरण आणि कांद्यासाठी तयार केलेल्या  विशिष्ट शीतगृहांचा वापर करून ही एकात्मिक कार्यप्रणाली विकसित केली आहे,रब्बी कांद्याचा साठवणूक कालावधी साडेसात महिन्यांपर्यंत वाढवण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे . ही प्रणाली  केवळ वाढीव साठवणूक काळ केवळ  सुनिश्चित करत नाही तर कांद्याची उच्च गुणवत्ता देखील कायम  राखते.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव  येथील कृषक (KRUSHAK)  अन्न विकिरण सुविधेला या प्रणालीच्या प्रोटोकॉलच्या अधीन राहून  साठवणूक  चाचण्या आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी अपग्रेड करण्यात आले .बीएआरसीच्या प्रोटोकॉलमध्ये तापमान, आर्द्रता आणि कार्बन-डायऑक्साइडच्या नियंत्रित परिस्थितीत रेडिएशन-प्रक्रिया केलेल्या कांद्याची साठवणूक समाविष्ट आहे. हा अभिनव प्रयोग  दर्जेदार कांद्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास, काढणीनंतरचे नुकसान प्रभावीपणे नियंत्रित करण्यास आणि कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत करेल. साठवणूक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, 8 डिसेंबर 2023 रोजी कृषक (KRUSHAK) परिसरात 'किसान मेळा' आयोजित करण्यात आला होता.

अणुऊर्जा विभागाचे सचिव, आणि  अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ अजित कुमार मोहंती यांनी किसान मेळ्यादरम्यान एकात्मिक साठवणूक आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन केले यावेळी  भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक  विवेक भसीन आणि अणुऊर्जा विभाग , महाराष्ट्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ मर्यादितचे  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'किसान मेळा'ला स्थानिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर हितसंबंधीतानी  चांगला प्रतिसाद दिला आणि अणुऊर्जा विभागा द्वारे कृषी नवोन्मेषाच्या  प्रगतीबद्दल माहितीच्या  देवाणघेवाणीसाठी  थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने व्यासपीठ प्रदान करून देण्यात आले.

मोठ्या प्रमाणात केलेल्या चाचण्यांचे  यशस्वी प्रात्यक्षिक हे भारतातील अन्न संरक्षण आणि स्वच्छता  वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून हे कृषी नवोन्मेषाबाबत  बीएआरसीची वचनबद्धता दर्शवते.

अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि  अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ अजित कुमार मोहंती नाशिकच्या लासलगाव येथे किसान मेळ्यादरम्यान एकात्मिक साठवणूक  आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करताना

 

भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक  विवेक भसीन नाशिक लासलगाव येथे किसान मेळाव्यादरम्यान बीएआरसी तंत्रज्ञानाचा वापर करून साठवणूक केलेल्या कांद्याचे नमुने वितरित करताना

 

नाशिकच्या लासलगाव येथील कृषक (KRUSHAK) अन्न विकिरण सुविधेमध्ये साठवणूक चाचणी आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांसाठी बीएआरसीद्वारे विकसित कांद्यासाठीचे विशेष शीतगृह

 

रेडिएशन तंत्रज्ञान आणि कांद्यासाठीचे विशेष  शीतगृह यांचा समावेश असलेल्या बीएआरसीच्या ऑप्टिमाइझ प्रोटोकॉलचा वापर करून रब्बी कांद्यासाठी साठवण कालावधी साडेसात महिन्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

 

  

नाशिकच्या लासलगाव येथील किसान मेळाव्यादरम्यान अणुऊर्जा बिभागाचे  शास्त्रज्ञ आणि स्थानिक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटनांचे सदस्य यांच्यातील संवाद

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986073) Visitor Counter : 76


Read this release in: English