आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आदिवासी कारागिरांना पॅनेलबद्ध करण्यासाठी ट्रायफेड उद्या मडगाव येथे करणार मेऴाव्याचे आयोजन

Posted On: 13 DEC 2023 7:20PM by PIB Mumbai

गोवा, 13 डिसेंबर 2023

 

आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाकडून(TRIFED) उद्या दक्षिण गोव्यात मडगाव येथे आदिवासी कारागिरांना पॅनेलबद्ध करण्यासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मडगाव येथे महानगरपालिका उद्यानासमोर दुसऱ्या मजल्यावर आदिवासी कल्याण उपसंचालकांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.

कुशल आदिवासी कारागिरांना पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या असामान्य कलाकौशल्याला मान्यता मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या आदिवासी समुदायांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि त्यांची असामान्य कलाकुसर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि उल्लेखनीय कौशल्य यांचे दर्शन घडवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या कारागिरांना पॅनेलबद्ध केल्यामुळे त्यांना विविध रचनाकार, निर्यातदार आणि हस्तकला क्षेत्रातील हितधारकांसोबत सहकार्य करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठबळ, बाजाराची उपलब्धता आणि संधी मिळतील.

आदिवासी कला आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ट्रायफेडच्या बांधिलकीचे या मेळाव्यातून दर्शन घडत आहे, असे ट्रायफेडचे महाव्यवस्थापक(दक्षिण) शुभजित तरफदार यांनी सांगितले. अत्यंत प्रतिभावंत असलेल्या कारागीरांना त्यांच्या असामान्य कलाकौशल्याचे दर्शन घडवण्यासाठी या महत्त्वाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत, असे ते म्हणाले.

या मेळाव्यामुळे आदिवासी कारागिरांना लक्षणीय पाठबळ मिळणार असून ज्यामुळे त्यांना त्यांच्या विशेष ओळख असलेल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिक सुधारित रचना आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून मदत मिळेल. त्याबरोबरच यामुळे त्यांना देशभरात विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या उत्सवांच्या माध्यमातून बाहेरच्या बाजारपेठांमध्येही वाव मिळेल. आदिवासी कारागीर पॅनेलबद्धता मेळाव्यांमुळे स्थानिक कारागिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन मागणीच्या माध्यमातून लक्षणीय वाव मिळणार आहे.

या मेळाव्यांमधून हाताने विणलेले वस्त्रप्रकार, सुबक दागिने, लाकडी कोरीव काम, आकर्षक भांडी आणि मनमोहक पेंटिंग्ज यांसारखे मंत्रमुग्ध करणारे आदिवासी कलांचे विविध प्रकार पाहायला मिळणार आहेत. आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि कपड्यावरील कलाकुसरीच्या संस्कृतीचे प्रतिबिंब प्रत्येक कलात्मक वस्तूमधून घडत आहे, ज्या कलात्मक गुणवत्तेच्या गाथांचे कथन करत आहेत.     

 

ट्रायफेडविषयीः

आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत असलेला भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ(TRIFED) आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील आदिवासी कारागीरांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

* * *

PIB Panaji | N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986007) Visitor Counter : 57


Read this release in: English