सहकार मंत्रालय
सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेची लोकसभेत माहिती
Posted On:
12 DEC 2023 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023
‘सहकारातून समृद्धी’, हा दृष्टीकोन साकारण्यासाठी, नवीन सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी सहकार मंत्रालय राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत आहे.
नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) अथवा प्राथमिक डेअरी/ मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी, पुढील पाच वर्षात प्रत्येक पंचायत/गावाचा समावेश करणारी योजना शासनाने मंजूर केली असून, यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ (NDDB), राष्ट्रीय मत्स्योत्पादन विकास मंडळ (NFDB), राष्ट्रीय सहकार विकास संस्था (NCDC) आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील संघटनांचे सहकार्य लाभणार आहे. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालानुसार, 24 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9,961 नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS)/ दुग्धव्यवसाय/ मत्स्यपालन सहकारी संस्थांची नोंदणी प्रक्रिया विविध टप्प्यात आहे.
सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1985590)
Visitor Counter : 152