इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

ज्ञानगंगेच्या प्रवाहाची सुरुवात: भारत मंडपम इथे, तीन दिवसांच्या जीपीएआय शिखर परिषदेचा शुभारंभ


भारताने जीपीएआय शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सर्व महत्वाचे उपक्रम- एआय संयुक्त राष्ट्र सल्लागार गट, यूके एआय सुरक्षा परिषद– आणले एका छताखाली

सर्व देशातील प्रतिनिधी आणि 100 तज्ञांचा परिषदेत सहभाग, 30 पेक्षा अधिक वक्त्यांचे मार्गदर्शन

150 पेक्षा जास्त स्टार्ट अप कंपन्या आणि महत्वाच्या तंत्रज्ञान कंपन्या या परिषदेत एआय विषयक उपकरणे आणि प्रयोग या जागतिक एआय एक्सपो मध्ये सहभागी

एआय नवोन्मेष क्षेत्राचे जागतिक केंद्र म्हणून भारताचा उदय: जीपीएआय शिखर परिषद 2023 नवी दिल्लीच्या केंद्रस्थानी

Posted On: 12 DEC 2023 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023

भारत, कृत्रिम बुध्दिमत्ता विषयक जागतिक परिषदेचा (GPAI), आगामी समर्थक अध्यक्ष, या नात्याने, भारतानं या क्षेत्रात आघाडी घेत, अत्यंत अभिमानाने, भारत मंडपम इथे 12 ते 14 डिसेंबर या दरम्यान, जीपीएआय शिखर परिषद आयोजित केली आहे. आज या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक जागतिक परिषदेचा शुभारंभ झाला. 28 सदस्य देशांचे आणि युरोपीय देशांचे प्रतिनिधी या अद्वितीय मंचावर एकत्र  आले असून, पुढचे तीन दिवस कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्राशी संबंध विचारमंथन केले जाणार आहे.

आरोग्यसेवा, प्राधान्य क्षेत्र आणि एआयचा जबाबदारीने वापर या मुद्यांवर भर देत,सकाळच्या सत्रांमध्ये विविध देश आणि क्षेत्रातील 25 हून अधिक वक्त्यांनी आपले विचार मांडले. या बौद्धिक विचारमंथनासोबत, अनेक समांतर सत्रे आयोजित करण्यात असून त्यात असंख्य महत्त्वाच्या विषयांना स्पर्श केला जाणार आहे. या अभूतपूर्व महत्वाच्या शिखर परिषदेने या सगळ्या विचारमंथनाला मंच उपस्थित करून दिला आहे.

'प्राधान्य क्षेत्रांमध्ये एआयचा वापर' या शीर्षकाअंतर्गत, सकाळच्या सत्रात, स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी, एआयच्या बाजारपेठेतील संधीचा शोध घेणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये त्याच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगांद्वारे एआयचा अवलंब करण्याच्या आव्हाने आणि संधींवर लक्ष केंद्रित केले गेले. या सत्रात, मुख्य वक्त्यांमध्ये पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा आणि इन्व्हेस्ट इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निवृती राय यांचा समावेश होता.

'जबाबदार एआय कार्यकारी गट' या विषयावरम दुसरे समांतर सत्र आज झाले. या सत्रात, 2023 मध्ये जबाबदार एआय उपाययोजनांची व्याप्ती वाढवणे आणि जबाबदारीने एआयचा वापर उपाय तयार करण्याशी संबंधित आव्हानांवर केंद्रित करण्यात आले होते. जागतिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'कॉम्प्रिहेन्सिव्ह-अॅट होम युनिव्हर्सल प्रायमरी हेल्थ केअर' (घरातच प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राची उपलब्धता) प्रकल्प आणि सार्वजनिक खरेदीसाठी एआयचा वापर करण्यासाठीचा सँडबॉक्स यावर चर्चा झाली.

"एआय अर्थात कृत्रिम बुध्दिमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला अधिक कृत्रिम बुध्दिमत्तेची गरज आहे" यावर एखादा वक्ता भर देत असताना कृत्रिम बुध्दिमत्ताधारित मजकूर शोधण्यासाठी विश्वसनीय पद्धतींची आवश्यकता हा एक कळीचा विषय होता. एआय जनरेटरचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी त्यांनी तयार केलेल्या सामग्रीसाठी विश्वसनीय शोध साधने प्रदर्शित करणे आवश्यक आहे यावर देखील जोर देण्यात आला.

'कृत्रिम बुध्दिमत्ता आणि जागतिक आरोग्य: प्रगत आरोग्यसेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका,' या विषयावरील सकाळच्या तिसऱ्या सत्रात हेल्थ एआयचे सीईओ डॉ रिकार्डो बाप्टिस्टा लेइट आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. शिष्टमंडळ प्रतिनिधींमध्ये PATH मधील भारत आणि दक्षिण आशियाचे डिजिटल आरोग्य संचालक समीर कंवर; जीई हेल्थकेअरचे अभियांत्रिकी उपाध्यक्ष गिरीश राघवन; निरामाईच्या संस्थापक डॉ. गीता मंजुनाथ आणि आय-दृष्टीचे सीईओ आणि संस्थापक किरण आनंदमपिल्लई यांचा समावेश होता.

"सार्वजनिक-क्षेत्रातील उपयोजनासाठी प्रगत उत्तरदायी कृत्रिम बुद्धिमत्ता" या संकल्पने अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) द्वारे सुसज्ज असलेल्या संशोधन परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. या परिषदेने आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. 36 पेक्षा जास्त देशांच्या प्रस्तुतीच्या अभूतपूर्व संकलनातून, अंतिम निवड झालेल्या 15 अपवादात्मक लेखकांनी जीपीएआय शिखर परिषदेत संकल्पनात्मक सादरीकरणे दिली. या विद्वत्ताप्रचूर कार्यक्रमादरम्यान सामायिक केलेल्या सामूहिक विद्वत्तेचा अंतर्भाव करणाऱ्या ‘एक्सटेंडेड अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स’ पुस्तकाच्या प्रकाशनाने परिषदेचा कळस गाठला.

या  दिवशी  आणखी चार सत्रांनी  भरलेला असणार आहे, ज्यात संशोधन परिषदेची परिणती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जीपीएआय शिखर परिषदेचे उद्घाटन यांचा अंतर्भाव आहे.

अद्ययावत माहितीसाठी, कार्यक्रमात आभासी माध्यमातून सहभागी व्हा आणि जीपीएआय शी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया   https://gpaidelhi2023.indiaai.gov.in/ ला भेट द्या. अभ्यागतांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पोर्टलमध्ये एआय -सक्षम चॅटबॉट देखील आहे. कार्यक्रमाचे तपशील व्हॅट्सऍप क्रमांक +91-9319613105 वरील एआय सक्षम  चॅटबॉटवर किंवा https://wa.me/919319613105?text=Hi वर देखील उपलब्ध आहेत.


S.Bedekar/R.Aghor/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1985580) Visitor Counter : 65


Read this release in: English , Hindi