माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य माध्यमाद्वारे साधला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी नागरिकांशी संवाद ’


विकसित भारत संकल्प यात्रेचा आतापर्यंत देशभरातील सव्वा कोटी नागरिकांनी घेतला लाभ


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल,नारायण राणे,डॉ. भागवत कराड,कपिल पाटील,डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नोंदवली या संवाद कार्यक्रमात उपस्थिती

Posted On: 09 DEC 2023 6:18PM by PIB Mumbai

 

केंद्र शासन पुरस्कृत तसेच  राज्य शासनाच्या योजनांची नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना माहिती व्हावी यासाठी देशभरात 15 नोव्हेंबर 2023 पासून  ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दृकश्राव्य माध्यमाद्वारे या यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत केंद्रीय योजनांमुळं भारतीयांना होत असलेल्या लाभाची माहिती दिली. त्याचबरोबर या विकसित भारत संकल्प यात्रेचा देशभरातील सव्वा कोटी नागरिकांनी लाभ घेतला असून अनेक ठिकाणी ही यात्रा येण्याआधीपासूनच लोक तिच्या स्वागतासाठी येत असल्याचं सांगितले . गावागावात शालेय विद्यार्थ्यांपासून ते अगदी जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व या यात्रेचं स्वागत करत आहेत. केंद्रीय योजनांमुळे शेतकरी, महिला आणि गरिब गरजूंना चांगल्या प्रकारे लाभ होत असल्याचे ही प्रधानमंत्री मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले .

महाराष्ट्रातही आज पंतप्रधानांबरोबर संवाद साधण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, नालासोपारा, मीरा भाईंदर, नाशिक, जालना, सांगली, नागपूर,छत्रपती संभाजीनगर अशा विविध भागातले लाभार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल,नारायण राणे,डॉ. भागवत कराड,कपिल पाटील,डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र सरकारचे मंत्री तसेच खासदार आणि आमदार यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील पंतप्रधान संवाद साधणार असलेल्या ठिकाणी उपस्थित राहून या नागरिकांशी संवाद साधला.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाअंतर्गत योजनांसाठी पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये हे पाहणे ही सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जनता यांची ही एकत्रित जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे आज मुंबईत माधव बाग, कावासजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर इथे केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे  यांच्यासह विकसित भारत संकल्प यात्रेच्या ठिकाणी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, मुंबईचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त  डॉ. इकबाल सिंह चहल, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य, उद्योग, आधार संबंधित तसेच इतर दालनांना भेटी देऊन माहितीही जाणून घेतली. तसंच नागरिकांनी आयुष्मान कार्ड, आरोग्य तपासणी, औषधे आणि उपचार, मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी करून घेतली.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी साधलेल्या संवाद ऐकण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उपस्थित राहिले. ‘मोदी की गॅरंटी’ वाल्या गाडीच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहे असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी केली जाईल आणि ज्यांची आधीच नोंदणी झाली आहे त्यांना हे लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. मुंबईत मीरा रोड येथील रामदेव पार्कच्या बुद्ध विहार येथे आलेली व्हीबीएसवाय गाडी आणि इतर सुविधा यांना भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले की विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर विकसित भारताचा राजदूत व्हायला हवे. मोदी की गॅरंटी वाली गाडी आपल्या गावात येण्या आधी  तिच्या माहितीचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच आधार मधील माहितीचे अद्ययावतीकरण यांसारख्या सुविधा देखील पुरवण्यात आल्या होत्या. त्यांचा लाभ घेतलेल्या स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम यांची प्रशंसा केली.

इतर अनेक मान्यवरांसह महाराष्ट्र राज्य सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा आणि  पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतीराज राज्य मंत्री कपिल पाटील  आणि महाराष्ट्राचे  

मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी कपिल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधण्याबारोबर सर्वांसोबत विकसित भारताची शपथ घेतली आणि पंतप्रधानाचे संबोधन ऐकले.  

केंद्र सरकारच्या विविध योजनांनी सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम केलं आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, उज्ज्वला गॅस योजना यासारख्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन अमूलाग्र बदल झाला असून, आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातल्या हसनाबाद इथं आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थित लाभार्थी आणि ग्रामस्थांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधन ऐकले.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणा दरम्यान उपस्थित ग्रामस्थांची प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मिळालेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. आमदार नारायण कुचे,  आकाशवाणीचे  उपमहासंचालक के के बाबूराजन यावेळी उपस्थित होते .

विकसित भारत संकल्प यात्रेत नाशिक जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख लाभपात्र व्यक्तींनी नोंदणी केली असून त्यांना आवश्यक ते लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने नियोजन करावे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील उस्तळे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उस्तळे  येथे करण्यात आलं त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. भारती पवार बोलत होत्या. नाशिक जिल्ह्यात 14 डिजिटल व्हॅनद्वारे केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात असून आतापर्यंत तीनशे गावांमध्ये यात्रा पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत केंद्र शासनाच्या योजना पोहोचत आहे . लाभार्थींची यादी तयार करून त्यांना योग्य वेळी लाभ कसा मिळेल यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावीत असे डॉ. भारती पवार म्हणाल्या.

ही यात्रा गावागावात पोहोचली असून आपल्या गावात कोणकोणत्या योजना राबविण्यात आल्या आहेत कोणत्या राबविणे बाकी आहे याविषयी माहिती देणारे जाहीर फलक ग्रामपंचायतींनी लावावे त्यामुळे नागरिकांमध्ये योजनांचा लाभ घेण्याविषयी जनजागृती होईल असे त्या म्हणाल्या

 केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जाणून घ्याअसं आहवान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची केलं. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली त्यावेळी कराड बोलत होते. 

 

संकल्प यात्रेतून ३४ ग्रामीण योजनेची माहिती आज भारतातील दोन लाख ७० हजार गावा मध्ये पोहचली आहे . आता पुर्वी सारखी परिस्थिती राहिलेली नाही. आता शासन आपल्या दारी येत आहे . केंद्र व राज्य सरकार सर्व सामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे अशी ग्वाही कराड यांनी या प्रसंगी दिली.

नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित नमो रोजगार मेळाव्यातही सुद्धा या संकल्प यात्रेच्या प्रचार वाहनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद ऐकला.

अहमदनगर जिल्ह्यातील राहता  तालुक्यातील साकुरी येथे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्रीराधाकृष्ण विखे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  दुरदुष्य प्रणाली द्वारे लाभार्थ्यांशी संवाद ऐकला. या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आकाश  भास्कर वाघमारे व राजेंद्र कचरू पिंपळे यांना यांना  विखे पाटील यांच्या  हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात  आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले.

कोल्हापुर  जिल्हयातल्या करवीर इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. भारताला बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी काम करा, असे  आवाहन त्यांनी नागरिकांना केले  

नांदेड तालुक्यातील बोरगाव (ते.)  येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लाभार्थ्याशी संवाद साधला. केंद्र शासनाने गेल्या नऊ वर्षात सामान्य माणसाला उपयुक्त ठरणाऱ्या अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांपासून अजूनही  दूर राहिलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने थेट आपल्या गावात योजनांची माहिती आणि अर्ज भरण्याची सुविधा विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचे यावेळी खासदार चिखलीकर म्हणाले. यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते आयुष्मान कार्डचे वाटप पात्र लाभार्थ्यांना करण्यात आले.

***

JPS/PK

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1984530) Visitor Counter : 168