ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खुल्या बाजारात विक्री योजनेद्वारे गहू आणि तांदळाचा विनियोग
Posted On:
04 DEC 2023 7:47PM by PIB Mumbai
मुंबई, 4 डिसेंबर 2023
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने त्यांच्या दिनांक 13.06.2023 च्या पत्राद्वारे खुल्या बाजार विक्री योजने (स्वदेशी) [(ओएमएसएस (डी)] द्वारे गहू आणि तांदुळाचा विनियोग करण्यास मान्यता जारी केली होती. गव्हाच्या चढ्या किंमती आटोक्यात ठेवून किंमत स्थिरीकरणाचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांना मिळण्यासाठी प्रति पॅन कार्ड 100 मेट्रिक टन मर्यादेसह केंद्रीय राखीव साठ्यातून 50 लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/सयंत्र/गहू उत्पादकांच्या उत्पादनांना ओएमएसएस (डी) अंतर्गत ई-लिलावाद्वारे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ओएमएसएस (डी) द्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदळाच्या विक्रीलाही मान्यता दिली आहे. उत्पादक आणि प्रक्रियादारांव्यतिरिक्त तांदळाच्या विक्री लिलावात तांदूळ व्यापारी देखील सहभागी होऊ शकतात. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोलीदार 10 मेट्रिक टनापासून जास्तीत जास्त 200 मेट्रिक टनापर्यंत गहू आणि 10 मेट्रिक टनापासून जास्तीत जास्त 1000 मेट्रिक टनापर्यंत तांदळाची बोली लावू शकतो. गहू आणि तांदूळ विक्रीसाठी भारतीय अन्न महामंडळातर्फे 28.06.2023 रोजी लिलावाची सुरुवात झाली आणि नंतर दर बुधवारी तो होतो. आजमितीस गव्हाचे 23 तर तांदळाचे 20 लिलाव झाले आहेत. या लिलावात 9,21,110 मेट्रिक टन गहू आणि 12,29,690 मेट्रिक टन तांदूळ रास्त सरासरी गुणवत्तेच्या गव्हासाठी 2150 रुपये/क्विंटलच्या राखीव किमतीत आणि विशिष्टतेचे निकष नसलेल्या गव्हासाठी 2125 रुपये/क्विंटल आणि पौष्टिक तांदळासाठी रु. 2973/क्विंटल आणि सामान्य सरासरी दर्जाच्या तांदळासाठी रु. 2900/क्विंटल राखीव किमतीत ठेवण्यात आला आहे. त्यापैकी 6,39,690 मेट्रिक टन गहू आणि 1710 मेट्रिक टन तांदूळ हे स्वीकारलेले प्रमाण आहे. दिनांक 29/11/2023 पर्यंत, ओएमएसएस (डी) द्वारे 5,12,615 मेट्रिक टन गहू आणि 1690 मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाद्वारे गहू आणि तांदूळ बाजारात विक्रीसाठी आणल्याने गहू आणि तांदळाच्या वाढत्या किमतीचा कल रोखण्यास मदत झाली आहे.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1982488)