संरक्षण मंत्रालय
गोव्याच्या एचक्यू-2 सिग्नल ट्रेनिंग सेंटरकडून निवृत्त सैनिक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
03 DEC 2023 7:02PM by PIB Mumbai
गोव्याच्या एचक्यू-2 सिग्नल ट्रेनिंग सेंटर या संस्थेने देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी आज 3 डिसेंबर 2023 बांबोलिम आर्मी कॅम्पमध्ये निवृत्त सैनिक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले. देशाच्या सेवेत असताना असामान्य धैर्य आणि समर्पित वृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या निवृत्त सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि युद्धात शौर्य गाजवणारे निवृत्त सैनिक आणि आणि वीर नारींसोबत एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी तसेच त्यांच्याविषयीच्या आपुलकीची भावना त्यांच्यासोबत सामाईक करून त्यांना समावेशकतेची हमी देण्यासाठी या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
या कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त निवृत्त सैनिक आणि तीन वीर नारी उपस्थित होत्या, ज्यामध्ये त्यांना विविध कल्याणकारी योजना आणि लाभ प्रदान करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ब्रिगेडियर ए. एस. साहनी, कमांडंट, एचक्यू 2 एसटीसी गोवा, यांनी देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या आणि बलिदान करणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निवृत्त सैनिक आणि वीर नारी यांच्याविषयी त्यांच्या उल्लेखनीय त्यागासाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सर्व निवृत्त सैनिकांपर्यंत पोहोचण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केलेल्या नव्या योजनांची आणि सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमधील सुधारणांची सविस्तर माहिती देखील दिली.
ईसीएचएस, रेकॉर्ड ऑफिस, बँका , जिल्हा सैनिक बोर्ड, एमएच आणि दंतवैद्यक सुविधा यांच्यासारख्या विषयांशी संबंधित विविध स्टॉल्स या कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले होते जेणेकरून या निवृत्त सैनिकांना त्यांच्या तक्रारी आणि अडचणींची माहिती देता येईल आणि त्यावरील उपाययोजना करता येतील.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982158)
Visitor Counter : 72