माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील रजपूतवाडी इथं दाखल 

Posted On: 03 DEC 2023 7:40PM by PIB Mumbai

 

भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन जनसामान्यांच्या कल्याणकारी तसंच विकासाच्या विविध योजनांचा जागर करीत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील  रजपूतवाडी या गावात दाखल झाली.

त्यावेळी रजपूतवाडी इथल्या ग्रामस्थांनी या संकल्प यात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी या विकसित भारत संकल्प यात्रेत  शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल ग्रामस्थ महिला शेतकरी आणि युवकांना माहिती देण्यात आली.

रजपूतवाडी गावाची लोकसंख्या 1 हजार 107 आहे. या गावात उज्जवला गॅस योजनेचे 40 लाभार्थी आहेत. तर पंतप्रधान किसान कल्याण योजने अंतर्गत 22 लाभार्थी आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 437 गोल्डन कार्ड धारक आहेत. आणि आभाकार्डचे एकूण 250 लाभार्थी आहेत.

या योजना गावागावात पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गावा-गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत असून राजपूतवाडी इथं लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या आणि लाभार्थ्यांच्या अडचणी आणि शंकांचं निरसनही जागेवर करण्यात आलं.

उज्वला गॅस योजनेमुळे लाकडं सरपण आणणं, धुरामुळे श्वसनाचा त्रास आदीपासून गृहिणींची सुटका झाली असून त्याबद्दल उज्जवला गॅस योजना लाभार्थी सुनंदा माळवे यांनी पंतप्रधानांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान किसान कल्याण योजनेमुळे शेती विषयक खर्चाची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर झाली आहे. भांगलण, मजुरांचे पगार, वीज बिल भागविण्यासाठी या रकमेचा मोठा उपयोग आपल्याला झाला आहे, याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत असं प्रधानमंत्री किसान कल्याण योजनेचे लाभार्थी रामसिंग रजपूत यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या या कल्याणकारी योजनांपासून रजपूतवाडी गावातील वंचित राहिलेल्या नागरिकांची विकसित संकल्प यात्रे दरम्यान केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती रजपूतवाडीच्या ग्रामसेविका गाथा खाडे यांनी दिली.

भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनविण्याचं स्वप्न साकार करण्याची शपथ यावेळी इथल्या ग्रामस्थांना देण्यात आली.

या यात्रेदरम्यान  गटविकास अधिकारी, रजपूतवाडी गावचे पदाधिकारी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

***

PIB Mum/DD/PK

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1982155) Visitor Counter : 127