माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे "कार्लोस सॉराज् फ्लेमेन्को इंडिया"  प्रदर्शनाचे केले उद्घाटन


सौरा यांची मुलगी आणि कासा दे ला इंडियाच्या संचालकांनी तयार केलेल्या प्रदर्शनात अष्टपैलू स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शकाने घेतलेल्या मूळ छायाचित्रांचा समावेश

प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कार्लोस सौरा यांना समर्पित विशेष चित्रपटाचे प्रदर्शन

Posted On: 01 DEC 2023 6:08PM by PIB Mumbai

 

ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी आज मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय) येथे "कार्लोस सॉराज् फ्लेमेन्को इंडिया" या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, नवी दिल्लीतील सर्व्हेन्टेस संस्थेचे प्रशासक अलेजांद्रो पाल्मा, आणि कासा दे ला इंडियाचे संचालक गिलेर्मो रॉड्रिग्ज यावेळी उपस्थित होते. कार्लोस सॉरा यांची मुलगी ॲना सॉरा आणि कासा दे ला इंडियाचे संचालक गिलेर्मो रॉड्रिग्ज यांनी तयार केलेल्या या प्रदर्शनात अष्टपैलू स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शकाने घेतलेली मूळ छायाचित्रे आहेत. यामध्ये फ्लेमेन्को यांच्या काही प्रसिद्ध  छायाचित्रांचा समावेश असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार म्हणून त्यांच्या कामाचा तो प्रमुख भाग आहे. तसेच त्यांच्या भारतातील प्रवासादरम्यान काढलेली काही छायाचित्रे आहेत.

छायाचित्रकार नाचो गॅलेगो यांच्या "फ्लेमेन्को इंडिया" या कार्यक्रमाचे छायाचित्र, वृत्तपत्रांमधील कात्रणे, व्हिडिओ इमेजेसचा समावेश आहे. तसेच, त्यांचा मुलगा कार्लोस सॉरा मेड्रानो, जो  चित्रपट निर्माता आणि "फ्लेमेन्को इंडिया" चा सहाय्यक दिग्दर्शक असून, आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या फील्ड ट्रिपमध्ये सहभागी होत असे, त्याची छायाचित्रेही आहेत.

उद्घाटन सत्रामध्ये, ‘कार्लोस सौरा यांचे भारतामध्ये स्वागतया विषयावर पॅनेल चर्चाही झाली. श्याम बेनेगल, नीरजा शेखर, अलेजांद्रो पाल्मा आणि गिलेर्मो रॉड्रिग्ज या चर्चासत्रात सहभागी झाले.

यावेळी बोलताना दिग्गज चित्रपट निर्माते श्याम बेनेगल म्हणाले, कार्लोस सौरा ही एक बहुप्रतिभावान व्यक्ती होती. ते  छायाचित्रकार होते, चित्रकार होते आणि त्यांना नृत्यही अवगत होते, खास करून फ्लेमेन्को नृत्य. ते अत्यंत ज्ञानी व्यक्ती होते. त्यांची काही रेखाचित्रे मला पिकासोच्या रेखाचित्रांची आठवण करून देतात.

लोकप्रिय सिनेमाचा संदर्भ देताना बेनेगल पुढे म्हणाले, “तुम्ही लोकप्रिय सिनेमा पाहिला, तर तो एक कथा सांगतो पण गाणी आणि नृत्य हे देखील कथेचा भाग आहेत. सिनेमातील नाट्य हे केवळ भारतीय सिनेमाचा भाग नसून, जगात बहुतेक सर्व ठिकाणी अशा प्रकारचेच चित्रपट बनवले जातात. फ्लेमेन्को आणि भारतीय कलेमध्ये काही साम्य आहे, त्यामुळे कोणीही त्याच्याशी जोडले जाऊ शकते.

भारत आणि स्पेनने विविध व्यासपीठांवर एकमेकांशी संवाद साधला आहे आणि दोन्ही देशांमध्ये अनेक बाबतीत समानता आहे. संस्कृती, खाद्यपदार्थ आणि वागणूक यातील समानतेमुळे दोन्ही देशांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीची भावना आहे.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांनी सांगितले.

कार्लोस सॉरा यांच्या कामाची प्रशंसा करून, त्यांनी नृत्य, संगीत आणि सादरीकरणाच्या  माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंधांचे उत्कृष्ट दस्तऐवजीकरण केल्याबद्दल त्यांच्या कलेला दाद दिली. त्यांनी अशा दस्तऐवजांना प्रोत्साहन दिले, जेणेकरून त्यांचे केवळ जतन होणार नाही, तर उर्वरित जगापुढे सांस्कृतिक वारसा म्हणून प्रदर्शित करता येतील. नवी दिल्लीतील सर्व्हेन्टेस संस्थेचे प्रशासक अलेजांद्रो पाल्मा म्हणाले, “कार्लोस सॉरासारखे कलाकार आपल्यासारख्या लोकांच्या आधी भविष्य पाहू शकतात कारण त्यांनी निम्मे स्पॅनिश-निम्मे भारतीय कलाकार घेऊन चित्रपटाची निर्मिती केली आहे . अशा प्रकारच्या सहकार्याची आज गरज आहे.”  इतर संस्कृतींशी संवाद साधल्याशिवाय आपली स्वतःची संस्कृती वाढवता येत नाही असे ते पुढे म्हणाले.  विविध कला प्रकार आणि स्वयंपाकासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून  विविध संस्कृतींचा परिचय करून देण्यासाठी स्पेनमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांचा  त्यांनी उल्लेख केला. त्यांनी रेशीम मार्गाचे उदाहरण दिले, जो केवळ व्यापाराचा मार्ग नव्हता, तर त्या मार्गाने अन्न, संस्कृती, गाणी आणि संगीत देखील खंडांमध्ये प्रवास करत होते.

कासा दे ला इंडिया चे दिग्दर्शक गिलेर्मो रॉड्रिग्ज यांनी कार्लोस सॉरा उद्धृत केले आणि कलेला कोणतेही राष्ट्रीयत्व नसते याचा पुनरुच्चार केला. त्यांचे मत होते की भारतामध्ये नृत्य आणि कथाकथनाची परंपरा असल्यामुळे भारतीय गाणी आणि नृत्य यांचा समावेश असलेल्या सौराच्या फ्लेमेन्को चित्रपटांशी त्वरित संपर्क साधू शकतात .

बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात  सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या आणि ऑस्कर, गोल्डन ग्लोब्स आणि सीझर अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळालेल्या सौराच्या "कारमेन" च्या प्रदर्शनानंतर पॅनेल चर्चा झाली.चित्रपटाचे  हे प्रदर्शन  कार्लोस सौराला समर्पित चित्रपट कार्यक्रमाचा भाग आहे जे "फ्लेमेन्को इंडिया बाय कार्लोस सॉरा" या प्रदर्शनाच्या बरोबरीने होणार आहे आणि यामध्ये "क्राया कुर्व्होस" (1976), "आयबेरिया" (2005), फ्लॅमेन्को फ्लॅमेन्को " (2011) आणि "कारमेन " (2011 मध्ये टिट्रो रिअल द्वारा निर्मित अँटोनियो गादेस आणि कार्लोस सौरा यांचा फ्लॅमेन्को बॅले ) या चित्रपटांचाही समावेश आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या  नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाद्वारे सादर करण्यात आले आहे आणि इन्स्टिट्यूटो सर्व्हेंटेस आणि वॅलाडोलिडमधील कासा दे ला इंडिया ने कासा दे ला इंडिया वॅलाडोलिड सिटी कौन्सिल (स्पेन) आणि दिल्ली-स्थित भागीदार टीमवर्क आर्ट्स आणि ओजस आर्ट यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रदर्शनाची निर्मिती केली आहे.  मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 1 ते 15 डिसेंबर दरम्यान या प्रदर्शनाला भेट देता येईल.

***

S.Patil/R.Agashe/S/Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1981776) Visitor Counter : 77


Read this release in: English