संरक्षण मंत्रालय
सदर्न स्टार विजय दौड 2023: 'सैनिकांसाठी दौड , सैनिकांसोबत दौड
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2023 5:30PM by PIB Mumbai
53 व्या विजय दिवसाच्या निमित्ताने, 16 डिसेंबर (शनिवार) रोजी दक्षिण कमांड मुख्यालयाच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC), पुणे येथे भव्य ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर्न स्टार विजय रन 2023 ही दौड ही 1971 च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलातील शूरवीर आणि जखमी सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित केली जाते. या दौडमध्ये समाजाच्या सर्व स्तरातून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि हे 1971 च्या युद्धामधील हुतात्मा सैनिक आणि नागरिकांच्या दृढ ऐक्याचे प्रतीक आहे. .
सदर्न स्टार विजय दौड 2023 मध्ये नागरिकांसाठी ‘सैनिकांसाठी दौड , सैनिकांसोबत दौड ’ ही एक अनोखी संधी असून ऐतिहासिक 190 वर्ष जुन्या पुणे रेसकोर्सवर या दौडला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. धावपटू देखील घोडेस्वारांप्रमाणेच मार्गक्रमण करतील आणि हिरवागार परिसर, निसर्गरम्य ठिकाणाचा , जंगल आणि स्थलांतरित पक्ष्यांचा आनंद लुटतील.
प्रत्येक नोंदणीकृत धावपटूला ड्राय फिट रन टी-शर्ट, फिनिशर बॅज, पौष्टिक नाश्ता, हायड्रेशन पॅक आणि वैद्यकीय सहाय्य मिळेल.हा कार्यक्रम सर्व स्तरातील लोकांना सैनिकांच्या बरोबरीने आणि लष्करी जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी देईल.
अंतर आणि वयोगट श्रेणी:-
53 अवर्स अल्ट्रा दौड - व्यावसायिक धावपटूंसह सोलो आणि रिले (2/3/4) श्रेणी:-
• 12.5 किलोमीटर दौड - पुरुष आणि महिला धावपटूंसाठी खुला प्रवर्ग (18 वर्षे आणि त्यावरील)
• 6 किलोमीटर दौड - सशस्त्र दलातील निवृत्त सैनिकांसाठी विशेष श्रेणी.
• 5 किलोमीटर दौड - विद्यार्थ्यांसह पुरुष आणि महिला धावपटूंसाठी खुली श्रेणी
बक्षिसे- 12.5 किलोमीटर आणि 5 किलोमीटर श्रेणींसाठी रोख बक्षिसे आणि इतर विविध श्रेणींसाठी पदके.
नोंदणी- सर्व नागरिकांसाठी नोंदणी खुली आहे. www.runbuddies.club या संकेतस्थळावर ₹ 100/- नोंदणी शुल्कासह ऑनलाइन नोंदणी केली जात आहे.
आपल्या शूरवीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला श्रद्धांजली अर्पणच्या दृष्टीने तुमचा पाठिंबा आणि ऐक्य दाखवण्यासाठी सहभागी व्हा. 53 अवर्स अल्ट्रा दौडसाठी 13 डिसेंबर 2023 आणि 12.5 किलोमीटर, 6 किलोमीटर आणि 5 किलोमीटर दौड श्रेणींसाठी 15 डिसेंबर 2023 ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.


***
M.Iyengar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1981231)
आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English