संरक्षण मंत्रालय

आठव्या पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी या कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचे संबोधन

Posted On: 29 NOV 2023 8:49PM by PIB Mumbai

पुणे, 29 नोव्हेंबर 2023

पुणे  इंटरनॅशनल सेंटरने  आयोजित केलेल्या आठव्या पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी या  कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे  यांचे 27 नोव्हेंबर 2023 रोजी भाषण झाले. पुणे  इंटरनॅशनल सेंटर, ऑब्झरवर रिसर्च फाउंडेशन चे सदस्य, लष्करी अधिकारी तसेच निवृत्त  अधिकारी या कार्यक्रमला उपस्थित होते.

राष्ट्राची प्रगती आणि सुरक्षेच्या गरजा यातील अविभाज्य दुवा, यावेळी लष्करप्रमुखांनी अधोरेखित केला. आर्थिक शक्ती जरी विकासाच्या अग्रभागी असली, तरीही, ‘सैन्य शक्ती’च्या आधारावर देशाच्या विविध गरजा पूर्ण करत, ‘देशाची सर्वंकष शक्ती’ सातत्याने वाढवण्याची क्षमता निर्माण करता येते असे जनरल  मनोज पांडे यांनी यावेळीसांगितले. 

सद्यस्थिती आणि एकूणच विकसित होत असलेल्या भू राजकीय परिस्थितीविषयी  बोलताना लष्कर प्रमुख म्हणाले की आता आपण ‘अनपेक्षित गोष्टी होण्याची’ तयारी ठेवायला हवी, कारण आजची  युद्धभूमी अधिक गुंतगुंतीची, स्पर्धात्मक झाली आहे.

मात्र, या बदलत्या परिस्थितीचा लष्करी परिणाम भारतीय सैन्यावर होणार नाही, असेही जनरल मनोज पांडे यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. सैन्याच्या क्षमतावाढीसाठी आणि आवश्यक ते बदल आत्मसात करण्यासाठी सुरक्षेवर प्रभाव टाकणारे किंवा सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

इतर सेवा संस्थांच्या सोबतीने एक आधुनिक, वेगवान, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता असलेले आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी तयार असलेले सैन्य, अनेक प्रकरचे युद्ध टाळणे आणि जिंकणे अशी क्षमता असलेले, देशाचे संरक्षण करण्यात सक्षम असलेल्या सैन्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठीच्या भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनाची त्यांनी  विस्तृत माहिती दिली. चार महत्वाच्या मुद्यांवर आधारित प्रगतीशील बदलांची सुरुवात यावरही त्यांनी भर दिला.

(a) सध्या असलेली अभूतपूर्व भू-राजकीय परिस्थिती. 

(b)विघटनकारी तंत्रज्ञानाची अमर्याद क्षमता. 

(c) आधुनिक युद्धांचे बदलते स्वरूप.

(d)सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील आमूलाग्र परिवर्तन.

क्षमता बांधणी : सैन्यदलांची पुनर्रचना आणि त्यांची क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचा भाग म्हणून, भारतीय लष्कर आपल्या संघटनात्मक संरचनेवर भर देत असून, 5G, AI, क्वांटम लॅब, इंटरनेट ऑफ मिलिटरी थिंग्ज, रोबोटिक्स, अ‍ॅडॉप्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी स्पेस अॅसेट्स यासह विशिष्ट तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी, राइटसाइझिंग, सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना करत आहे.  क्षमता विकास करण्याचे हे प्रयत्न आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे  त्यांनी सागितले.

राष्ट्र बांधणी : भारतीय लष्कर, देशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतांना, विविध प्रयत्नांद्वारे राष्ट्र उभारणीतही महत्त्वपूर्ण योगदान देते. या वचनबद्धतेसाठी लष्कराने  समन्वय साधला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: देशाच्या दुर्गम भागात पायाभूत सुविधांच्या विकासात भारतीय लष्कराचे योगदान त्यांनी विस्तृतपणे सांगितले. सीमा क्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना सक्षम करण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने सीमा क्षेत्र पर्यटन आणि इतर विविध उपक्रमांना प्रोत्साहन देऊन स्थानिक समुदायांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी लष्कर करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.

 

M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1980964) Visitor Counter : 80


Read this release in: English , Urdu , Hindi