माहिती आणि प्रसारण मंत्रालय
"विकसित भारत संकल्प यात्रा" या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते आज भडगाव येथे शुभारंभ
Posted On:
25 NOV 2023 11:02PM by PIB Mumbai
जळगाव-
भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत *"विकसित भारत संकल्प यात्रा"* ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी आज भडगाव येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला. विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद आहे, अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
उन्मेश पाटील पुढे म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जून-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने "विकसित भारत संकल्प यात्रा" ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे.
****
Shilpa N/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1979863)
Visitor Counter : 94