सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्र शासन दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील- केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती प्रतिमा भौमिक
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगरमध्ये 1409 दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य नि:शुल्क वाटप
Posted On:
25 NOV 2023 4:51PM by PIB Mumbai
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर 2023

केंद्र शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचा सन्मान केला आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती प्रतिमा भौमिक यांनी केले.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून दिव्यांग बांधवांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. दिव्यांग सामाजिक अधिकारीता शिबिराचे आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरामध्ये चौदाशेहून अधिक दिव्यांगांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, दिव्यांगाच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग विकासासाठी 27 हजार कोटी रुपयाहून 54 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य संदर्भात अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दिव्यांगाना सरकारी नोकरीमध्ये चार टक्के आरक्षणची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. यापूर्वी आरक्षण तीन टक्के होते त्यामध्ये एक टक्क्यानी वाढ केली आहे. यापुढेही दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य असेल, असे डॉ.कराड म्हणाले.

1409 दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक अधिकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 1409 दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवण यंत्र,काठी, स्मार्ट फोन लाभार्थीना निःशुल्क देण्यात आले. यासाठी सरकारला सुमारे दीड कोटी रुपये खर्च आला.
***
S.Pophale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1979755)
अभ्यागत कक्ष : 115