माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ओटीटी मंचाने स्वतंत्र आणि सर्जनशील चित्रपटासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली पाहिजे: मनोज बाजपेयी
सातत्यपूर्ण दर्शकसंख्या असणे, हा ओटीटीचा सर्वात मोठा फायदा : श्रीकृष्ण दयाल
54व्या इफ्फीमधील मास्टरक्लासने दिले ओटीटीसाठी आकर्षक वेब सिरीज तयार करण्याच्या कलेचे धडे
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2023
गोवा येथे आयोजित 54 व्या इफ्फीमध्ये मनोज बाजपेयी, राज निदिमोरू, कृष्णा डीके, अपूर्व बक्षी आणि श्रीकृष्ण दयाल या रुपेरी पडद्यावरील दिग्गजांसह, ओटीटीसाठी आकर्षक वेब मालिका तयार करण्यासंदर्भात एक मास्टर क्लास सत्र आयोजित करण्यात आले होते.
(डावीकडून उजवीकडे : नमन रामचंद्रन, अपूर्वा बक्षी, राज निदिमोरू, कृष्णा डीके, मनोज बाजपेयी, श्रीकृष्ण दयाल)
नमन रामचंद्रन यांनी या सत्रात सूत्रसंचालन केले, या सत्रात ओव्हर-द-टॉप (ओटीटी ) मंचावर डिजिटल प्रेक्षकांसाठी प्रभावी कथा मांडण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेबाबत आणि बारकाव्यांसंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सिनेसृष्टीतील उत्कृष्टतेचे दीपस्तंभ असलेल्या मनोज बाजपेयी यांनी एका अभिनेत्याचा अनाकलनीय प्रवास उलगडला.एखाद्या अभिनेत्याच्या आकांक्षा आणि पात्रात जीव ओतण्याच्या समर्पणाचा कॅनव्हास त्यांनी आपल्या शब्दांनी रंगवला. तयारी, सातत्य, पात्राचा आलेख आणि प्रत्येक अभिनेत्याचा कस याला आव्हान देणारा आणि उंचावणारा प्रवाह स्वीकारणे याला सर्वांत महत्त्व आहे यावर त्यांनी भर दिला.. “तुम्हाला भूमिकेसाठी चांगली तयारी करावी लागेल आणि अन्य सर्व विसरून नवीन कल्पनांना ग्रहण करण्यासाठी तुमचे मन रिकामे ठेवावे लागेल, यावरही त्यांनी भर दिला.
ओटीटी मंचाने स्वतंत्र सर्जनशील चित्रपटासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली पाहिजे, असे ओटीटीचे यश, अपयश आणि भवितव्य यावर बोलताना द फॅमिली मॅनमधील अभिनेते मनोज बाजपेयी यांनी सांगितले.
ओटीटीवर गाजलेल्या 'द फॅमिली मॅन' ची गाथा सांगताना मनोज बाजपेयी यांनी तयारीतील ताकदीचा कस आणि पात्राचा प्रवास पडद्यावर जगण्याची कला उलगडली. "तयारी ही गुरुकिल्ली आहे", असे त्यांनी सांगितले. “तुमच्या कामगिरीमध्ये तोचतोच पणा येऊ नये म्हणून शिकणे आणि नवीन कल्पनांसाठी खुले असणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी उलगडलेला त्यांचा संघर्ष एखाद्या अभिनेत्याच्या कौशल्याला बळ देणारा होता.
नाट्यकर्मी आणि द फॅमिली मॅन मालिकेतील आणखी एक प्रमुख अभिनेते श्रीकृष्ण दयाल यांनी रंगमंच आणि ओटीटीच्या डिजिटल कॅनव्हासमधील संबंध विशद केले. सातत्यपूर्ण दर्शकसंख्या हा ओटीटी मंचाचा सर्वात मोठा फायदा आहे, असे त्यांनी नमूद केले. रंगमंचावरील अनुभवातून आत्मसात केलेली शिस्त ही अभिनयाच्या विविध प्रकारांमध्ये अभिनेत्यांकडील क्षमतेचे संवर्धन करण्यास सक्षम करते, असे ते म्हणाले.
ओटीटी मालिका द फॅमिली मॅनचे सह-दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी ओटीटीच्या सातत्याने विकसित होत असलेल्या परिदृश्यावर माहितीपटाचा सखोल प्रभाव अधोरेखित केला. आणि बदलत्या प्रतिमानाच्या भाव भावनांवर प्रकाश टाकला. या कथनांचा मंचावर होणारा महत्त्वपूर्ण परिणाम त्यांनी ठळकपणे मांडला.
ओटीटी मालिका द फॅमिली मॅनचे सह-दिग्दर्शक कृष्णा डी.के. यांनी शाश्वत शिक्षण, अनध्ययन आणि पुन्हा शिकण्याचा कॅनव्हास रंगवला याने ओटीटी मंचासाठी स्वतंत्र चित्रपट निर्मिती, कार्यक्रम आणि मालिकेचे क्षेत्र तयार करण्यास मदत केली आहे.
राज आणि डी.के. या दिग्दर्शक जोडीने ओटीटीवरील त्यांच्या कामाचा स्प्रिंगबोर्ड म्हणून स्वतंत्र चित्रपट निर्मितीचा त्यांचा अनुभव मांडला. आणि हे ओटीटी वरील त्यांच्या कलाकृतीला अनोखा आकार देते, असे सांगितले. कथेतील आत्मविश्वासाचे महत्त्व जे आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत काम करत असतानाही प्रभावी कथा मांडण्यासाठी करण्यास प्रवृत्त करते, यावर त्यांनी भर दिला.
बँकर्स ते प्रसिद्ध 'दिल्ली क्राइम' मालिकेच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांनी काल्पनिक आणि गैर-काल्पनिक दोन्ही शैलींमध्ये कथा मांडण्यासाठी आवश्यक गोष्टींची रूपरेषा सांगत , कथेमधील विश्वासाच्या सारांशावर भर दिला. ओटीटी कार्यक्षेत्रामध्ये बायबल म्हणून ओळखल्या जाणार्या नवीन मालिकेसाठी तयारी करण्याबद्दल तपशीलवार माहिती देताना, त्यांनी काल्पनिक कथांमध्ये सुस्पष्ट संकल्पनेची निर्णायक भूमिका आणि काल्पनिक शैलीतील सखोल संशोधनाची आवश्यकता मांडली.
सत्राच्या शेवटी, मनोज बाजपेयींच्या आगामी ओपस जोरामचा ट्रेलर देखील दाखवण्यात आला , या ट्रेरलमुळे प्रेक्षकांमध्ये आणखी एक सिनेमॅटिक कुतुहल निर्माण केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, डिजिटल क्षेत्रात समृद्ध होत असलेल्या अध्यायामागील कल्पकता आणि प्रतिभा यांचा सन्मान करण्यासाठी इफ्फीने यावर्षी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी ) पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. यावर्षी, 15 ओटीटी मंचांवरून 10 भाषांमध्ये 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. विजेत्या मालिकेला प्रमाणपत्रे आणि रु. 10 लाख रोख बक्षीस रक्कम म्हणून दिली जाईल, याची घोषणा समारोप समारंभात करण्यात येणार आहे.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979629)
Visitor Counter : 128