माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध - राज्यपाल रमेश बैस
विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त देशभरात आज आरोग्य शिबिराचे आयोजन; महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात 36 ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ
Posted On:
21 NOV 2023 6:16PM by PIB Mumbai
मुंबई, 21 नोव्हेंबर 2023
आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता, अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, गरिबांसाठी घरे, अन्न सुरक्षा, योग्य पोषण, विश्वसनीय आरोग्य सेवा, अशा कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा ‘विकसित भारत संकल्प यात्रेचा’ मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज मोडाळे ता. इगतपुरी येथे केले.
मोडाळे , ता. इगतपुरी येथे विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त आयोजित महाशिबीर कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी श्री. बैस बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'टीबीमुक्त भारत' मोहिमेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.निक्षय मित्र' बनण्यासाठी हजारो नागरिक पुढे आले आणि क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. या मोहिमेप्रमाणेच प्रयत्न केल्यास लोक कुपोषणाने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड (KCC), प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल - जल जीवन मिशन, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, नॅनो फर्टिलायझर्स इत्यादी योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी लागेल. यामध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सहभाग वाढवून यात्रा यशस्वी करावी, असे आवाहनही राज्यपाल बैस यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रा सर्वसमावेशक प्रगतीसाठी वचनबद्ध आहे. प्रत्येक गावाला आणि प्रत्येक नागरिकाला विकास योजनांचा लाभ मिळावा, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे याची हमी ही यात्रा देत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त देशभरात विविध ठिकाणी आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या संकल्प यात्रेदरम्यान आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड बनवून घेणे, क्षय, सिकलसेल, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांची तपासणी यासारख्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.
महाराष्ट्रात नंदुरबार , पालघर, नाशिक, गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा प्रामुख्याने आयोजित करण्यात आली असून हे प्रचार रथ वेगवेगळ्या गावांमध्ये पोहचत असून गावकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात आज या पाच जिल्ह्यात एकूण 36 ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रा आज पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावात दाखल झाली. यावेळी गावकऱ्यांनी संकल्प रथातील चित्रफितींच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेतली. पालघरच्या वाडा तालुक्यातील नांदणी येथे आज विकसित भारत संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त गावात माहितीपर कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी शिबीर यांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, नांदणीतील गावकऱ्यांनी भारताला विकसित देश बनवण्याची प्रतिज्ञाही घेतली.

विकसित भारत संकल्प यात्रा आज नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जलधारा येथे पोहचली. यावेळी मोठ्या थाटात यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली.

1A1H.jpeg)
नंदुरबार जिल्यातील तळोदा येथे विकसित भारत संकल्प यात्रे निमित आयोजित माहितीपर कार्यक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.


विकसित भारत संकल्प यात्रेचे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा आरमोरी तालुक्यातील वघाळा (बर्डी) येथे पोहचली. याप्रसंगी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात बालकांची तपासणी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, इगतपुरी या तालुक्यात आज विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाली.

AVSQ.jpeg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रा रवाना केल्यानंतर देशभरातील विविध भागात संकल्प रथ ठिकठिकाणी जाऊन विविध शासकीय योजनांबद्दल व्यापक जनजागृती करत आहेत.
सरकारच्या या विशाल संपर्क कार्यक्रमाचा भाग असलेले हे संकल्प रथ म्हणजे विशेष प्रकारे रचना केलेल्या 5 आयईसी (माहिती,शिक्षण आणि संपर्क) व्हॅन आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रमुख योजना, ठळक मुद्दे आणि कामगिरी दर्शवणाऱ्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रफिती , माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके आणि फ्लॅगशिप स्टँडीच्या माध्यमातून माहितीचा प्रसार करण्यासाठी या आयईसी व्हॅन्स अर्थात प्रसार रथ सुसज्ज आहेत.
सरकारी योजनांचे लाभ कालबद्ध पद्धतीने सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत संपूर्णपणे पोहोचत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे तसेच कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणे यावर या यात्रेचा भर आहे.
S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1978570)
Visitor Counter : 149