अर्थ मंत्रालय

आयईपीएफए-एनसीएईआर-एनएसईतर्फे "डिजिटल जगात गुंतवणूकदारांचे संरक्षण: वित्तीय सल्लागारांची भूमिका आणि महत्व " या विषयावर संयुक्त परिषदेचे आयोजन

Posted On: 20 NOV 2023 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023

नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांच्या सहकार्याने इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (आयईपीएफए) ने 20 नोव्हेंबर 2023 रोजी, मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे  डिजिटल जगात गुंतवणूकदारांचे संरक्षण: वित्तीय सल्लागारांची भूमिका आणि महत्व या संकल्पनेवर परिषद आयोजित केली होती.

गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमाचा एक भाग म्हणून गुंतवणूकदार जागरुकता उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत डिजिटल परिदृश्यात वित्तीय सल्लागारांचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्यात जटिलता दूर करणे , माहितीपूर्ण निर्णय घेणे आणि अंतिम वापरकर्ता म्हणजेच गुंतवणूकदाराच्या आर्थिक हिताचे  रक्षण करण्यासाठी जबाबदार मार्गदर्शक, शिक्षक आणि संरक्षक म्हणून त्यांची भूमिका अधिक विस्तृतपणे विशद करण्यात आली.

या परिषदेसाठी सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. पॅनेलच्या सदस्यांनी उदयोन्मुख  डिजिटल वातावरणात गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यात वित्तीय सल्लागारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत आपले अनुभव आणि विचार सामायिक  केले.

जसजसे जग डिजिटल संक्रमणाकडे वळत आहे, आर्थिक साक्षरता आणि समावेशकता या घडामोडींची संभाव्यता लक्षणीयपणे उलगडून दाखवेल. या अभ्यासपूर्ण परिषदेच्या यशस्वी समारोपानंतर  आयोजक आर्थिक जागरूकता वाढवण्याप्रति आणि वेगाने विकसित होत असलेल्या आर्थिक परिदृश्यात गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेसह शाश्वत सहकार्य निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत.

कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या  आयईपीएफए मधील  महाव्यवस्थापक तुषार आनंद यांचे मुख्य भाषण झाले. त्यांनी  एनसीएईआर, आयआयसीए, आयपीपीबी, सीएससी  , एनवायकेएस , आयसीएआय, आयसीएसआय आणि इतर संस्थांसोबत आयईपीएफएच्या व्यापक सहकार्याची माहिती दिली.  शिक्षण, तांत्रिक साक्षरता, पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणाला चालना देण्यासाठी विश्वास वाढवण्यावर या सहकार्याचा भर आहे. महाव्यवस्थापक तुषार आनंद म्हणाले की, दाव्यांचा निपटारा करण्यामधील प्रगती जीवन आणि व्यवसाय सुलभता उपक्रमांशी सुसंगत आहे. एनसीएईआर आणि एनएसई सोबतचे सहकार्य गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि संरक्षणाच्या विविध पैलूंप्रति वचनबद्धता अधोरेखित करते, ज्यात डिजिटल आर्थिक परिदृश्यात शाश्वत विकासासाठी नैतिक मार्गदर्शन आणि शिक्षित गुंतवणूकदारांची कल्पना केंद्रस्थानी आहे.

मुख्य भाषण : लेफ्टनंट कर्नल तुषार आनंद, महाव्यवस्थापक , आयईपीएफए, कंपनी व्यवहार मंत्रालय

आयईपीएफए बद्दल

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफए) ची स्थापना 7 सप्टेंबर 2016 रोजी केंद्र सरकारच्या कंपनी  व्यवहार मंत्रालय अंतर्गत, करण्यात आली. समभाग , दावा न केलेला लाभांश, परिपक्व ठेवी/ रोखे आदींचा गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी ही स्थापना करण्यात आली.

एनसीएईआर बद्दल

एनसीएईआर ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी स्वतंत्र आर्थिक विचारवंतांचा समावेश  असलेली  संस्था  आहे, ज्याची स्थापना 1956 मध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांसाठी धोरण निवडींबाबत माहिती देण्यासाठी करण्यात आली होती.

 N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1978344) Visitor Counter : 46


Read this release in: English