ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या माध्यमातून भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातून 4,60,122 एमटी गहू आणि 1690 एमटी तांदळाची उचल
Posted On:
20 NOV 2023 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या ओएमएसएस(डी) अर्थात देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेतून रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी 4,60,122 एमटी गहू आणि 1690 एमटी तांदूळाची उचल करण्यात आली.
दिनांक 28 जून 2023 रोजी एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातील गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीचा लिलाव सुरु झाला आणि तेव्हापासून दर बुधवारी असा लिलाव करण्यात येतो. आतापर्यंत गव्हाच्या विक्रीसाठीचे 21 आणि तांदळाच्या विक्रीसाठीचे 17 लिलाव झाले आहेत. या लिलावाच्या माध्यमातून 8,30,910 एमटी गहू आणि 12,09,760 एमटी तांदूळ खुला करण्यात आला असून सरासरी योग्य दर्जाचा गहू 2150 रुपये क्विंटल या राखीव दराने तर वैशिष्ट्यांच्या अटी शिथिल केलेला गहू 2125 रुपये क्विंटल दराने आहे. त्याचप्रमाणे पोषणयुक्त तांदूळ 2973 रुपये क्विंटल दराने तर एफएक्यू तांदूळ 2900 रुपये क्विंटल दराने देऊ करण्यात आला आहे.
देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या [ओएमएसएस(डी)] माध्यमातून गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनुसार, गिरण्या, धान्यांवर प्रक्रिया करणारे तसेच गव्हापासून इतर उत्पादनांची निर्मिती करणारे यांना ई-लिलावाच्या माध्यमातून केंद्राच्या साठ्यातून 50 लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध करून देण्यासाठी त्याचप्रमाणे, ओएमएसएस(डी) च्या माध्यमातून25 लाख मेट्रिक टन तांदळासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे.
गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक पॅन कार्ड साठी 100मेट्रिक टन गव्हाच्या विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे जेणेकरून दर स्थिरीकरणाचे लाभ खऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचतील. तांदूळ उत्पादक आणि त्यावर प्रक्रिया करणारे यांच्यासह, तांदळाचे व्यापारी देखील विक्री लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या लिलाव प्रक्रियेत बोली लावणाऱ्याला 10 मेट्रिक टनांपासून जास्तीतजास्त 200 मेट्रिक टन गव्हासाठी तसेच 10 मेट्रिक टन ते जास्तीतजास्त एक हजार मेट्रिक टन तांदळासाठी बोली लावता येईल. भारतीय अन्न महामंडळाच्या राखीव साठ्यातून गहू आणि तांदूळ बाजारात उतरवल्यामुळे या धान्यांच्या चढ्या दराना आळा बसणार आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1978285)
Visitor Counter : 82