माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आगामी इफ्फीच्या पार्श्वभूमीवर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट , संबंधित ठिकाणांचा दौरा करून तयारीचा घेतला आढावा 


यंदा प्रतिनिधिंची विक्रमी नोंदणी अपेक्षित: माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन

प्रविष्टि तिथि: 09 NOV 2023 5:46PM by PIB Mumbai

 

गोव्यात आयोजित भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी(  इफ्फी) यंदा प्रतिनिधिंची विक्रमी संख्येने नोंदणी अपेक्षित आहे असे,माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी सांगितले.  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या पणजी येथील अल्टिन्हो या निवासस्थानी   गुरुवार, 19.11.2023 रोजी   भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.गोव्यातील 54 व्या इफ्फीच्या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे मुरुगन यांनी सांगितले.

गोव्याला इफ्फी महोत्सवाचे कायमस्वरूपी ठिकाण घोषित केल्यानंतर इफ्फीची लोकप्रियता वर्षानुवर्षे वाढतच आहे. या वर्षी देखील, आम्हाला महोत्सवाच्या  लोकप्रियतेत अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.  गेल्या वर्षीची या महोत्सवासाठी  झालेली प्रतिनिधी नोंदणी ही  महोत्सवाच्या लोकप्रियतेची साक्ष होती. आम्हाला यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधी नोंदणीची अपेक्षा आहे,” असे  मुरुगन म्हणाले. देशातील चित्रपट उद्योगाने हा  महोत्सव स्वतःचा मानावा  असे  सरकारला वाटते, असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट महोत्सव  सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणून गणला जावा असे आम्हाला वाटत नाही. भारतीय चित्रपट उद्योगाने हा  महोत्सव आपला  समजावा असे सरकारला वाटते, यावर त्यांनी भर दिला.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत मुरुगन म्हणाले की, हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकल डग्लस यांचा राज्याचे  अतिथी  म्हणून विचार करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. “  मायकल डग्लस यांची उपस्थिती  यंदाच्या महोत्सवाचे   आकर्षण  असेल. आम्ही त्यांना या महोत्सवात सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

मुरुगन यांच्यासोबत  इफ्फी संदर्भातील  विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आम्ही तयारीचाही आढावा घेतला. महोत्सवाची  सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, असे ते म्हणाले.

त्यानंतर   मुरुगन यांनी महोत्सवाच्या समन्वय समितीच्या बैठकीला  हजेरी लावली. मंत्र्यांनी गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि प्रोमेनेड या चित्रपट बाजाराच्या ठिकाणांना भेट  दिली. त्यांनी कला अकादमी आणि आयनॉक्स चित्रपटगृह , महोत्सवाची प्रमुख ठिकाणे आणि   यावर्षी भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ज्या ठिकाणी  सिनेमेळा आयोजित करणार आहे त्या कांपाल मैदानाला देखील भेट दिली. 

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1975970) आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Tamil