ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खुल्या बाजारातील विक्री योजनेद्वारे भारतीय अन्न महामंडळ(एफसीआय) करणार 50 लाख मेट्रिक टन गहू आणि 25 लाख मेट्रिक टन तांदळाचे वितरण

Posted On: 07 NOV 2023 5:25PM by PIB Mumbai

 

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण  मंत्रालयाने 13 जून 2023 रोजी खुल्या बाजारातील विक्री योजना (देशांतर्गत) [(OMSS (D)] द्वारे गहू आणि तांदूळ यांच्या साठ्याचे वितरण करण्यास एका पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यानुसार केंद्रीय साठ्यामधून 50 लाख मेट्रिक टन गव्हाचे वितरण पिठाच्या गिरण्या/ प्रक्रियाकर्ते/ गव्हाच्या उत्पादनांचे निर्माते यांना प्रति पॅनकार्ड 100 मेट्रिक टन मर्यादेसह खुल्या बाजारातील विक्री योजना(देशांतर्गत) अंतर्गत ई-लिलावाद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गव्हाच्या वाढत्या भावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष ग्राहकांना स्थिर झालेल्या भावांचा लाभ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याच प्रकारे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारातील विक्री योजना(देशांतर्गत)द्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदळाच्या विक्रीला देखील मंजुरी दिली आहे. उत्पादक आणि प्रक्रियाकर्त्यांव्यतिरिक्त तांदळाच्या व्यापाऱ्यांना देखील तांदळाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार बोलीदार 10 मेट्रिक टन ते कमाल 200 मेट्रिक टनांपर्यंत गव्हाची आणि तांदळाची 10 मेट्रिक टनांपासून कमाल 1000 मेट्रिक टनांपर्यंत  बोली लावू शकतो. एफसीआयचा गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीचा लिलाव 28-6-2023 रोजी सुरू झाला आणि नंतर प्रत्येक बुधवारी लिलाव करण्यात आला. आतापर्यंत गव्हाचे 19 आणि तांदळाचे 16 लिलाव झाले आहेत. या लिलावादरम्यान, 7,40,710 MT गहू आणि 11,11,920 MT तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या लिलावात सामान्य सरासरी प्रतीच्या गव्हासाठी रु. 2150/क्विंटल, निकषांमधील सवलतप्राप्त गव्हासाठी रु. 2125/क्विंटल, पोषणमूल्य जास्त असलेल्या तांदळासाठी रु. 2973/क्विंटल आणि सामान्य सरासरी प्रतीच्या तांदळासाठी रु. 2900/क्विंटल राखीव दराने या लिलावात विक्री करण्यात आली. यापैकी गव्हाची स्वीकृत प्रमाण  4,18,890 MT आणि तांदळाचे 1690 MT इतकी उचल करण्यात आली. एफसीआयने इतक्या मोठ्या प्रमाणात खुल्या केलेल्या या धान्यामुळे गहू आणि तांदळाच्या दरांच्या वाढत्या कलावर नियंत्रण ठेवता आले.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975459) Visitor Counter : 126


Read this release in: English