संरक्षण मंत्रालय

पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो

Posted On: 05 NOV 2023 5:11PM by PIB Mumbai

 

भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण  कमांडने  4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा संकुलात मोटर सायकल डेअर डेव्हिल शो आयोजित  केला होता.

भारतीय लष्करातील, हा  मोटर सायकल चालक चमू, “द डेअर डेव्हिल्स”,  चमू म्हणून ओळखला  जातो . जबलपूर इथल्या मुख्यालयात सिग्नल प्रशिक्षण केंद्रात 1935 पासून या चमूला प्रशिक्षण दिले जाते. गेल्या अनेक वर्षात, या चमूने अनेक महत्वाच्या कामगिऱ्या यशस्वी केल्या आहेत आणि आतापर्यंत 29 जागतिक विक्रम रचले आहेत. गिनीज आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस यांच्याकडून त्यांच्या विक्रमांची नोंद देण्यात आली आहे.

सुभेदार प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली 28 इतर धाडसी मोटार सायकल स्वारांच्या या डेअर डेव्हिल्सचे हे पथक   आहे. जबलपूर चा अभिमान असलेले, ‘डेअर डेव्हिल्सकेवळ त्यांच्या व्यवसायातच पारंगत नाहीत तर 'अतिरिक्त सामान्य आत्मनिर्णय, अतुलनीय धैर्य आणि मोटारसायकल हाताळण्यातील अचूकतायात देखील ते पारंगत आहेत. त्यांनी अत्यंत रोमांचक आणि धाडसी कवायती करून, 1971 च्या युद्धातील सर्व शूरांना श्रद्धांजली वाहिली.  दुचाकीवरील 38  अशा विलक्षण आणि अतुल्य मानवी रचनांचा त्यात समावेश होता.

या कार्यक्रमाला  3000 हून अधिक लष्करी अधिकारी , जवान, माजी सैनिक, महिला आणि मुले उपस्थित होती.  दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ आणि कर्नल कमांडंट कोअर  ऑफ सिग्नल्स लेफ्टनंट जनरल मंजीत कुमार यांनी यावेळी डेअर डेव्हिल्सचा सत्कार केला.

***

M.Iyengar/R.Aghor/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974872) Visitor Counter : 74


Read this release in: English