दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दक्षता जनजागृती सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन- उप. पोलीस महानिरीक्षक, सीबीआय पुणे आणि पोलीस अधीक्षक, एसीबी , पुणे यांनी केले टपाल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन"
Posted On:
04 NOV 2023 4:23PM by PIB Mumbai
30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जागरुकता सप्ताह 2023 निमित्ताने, पुणे शहर पूर्व डाक विभागातर्फे 3 नोव्हेंबर 2023 रोजी पदमजी हॉल, MCCIA, पुणे येथे टपाल कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर हिरेमठ (आयपीएस), उप. पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) पुणे आणि मुख्य वक्ते, श्री अमोल तांबे (आयपीएस), पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची उपस्थिती लाभली.

पुणे शहर पूर्व टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अभिजित इचके यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे सुधीर हिरेमठ यांनी सीबीआयची कार्यपद्धती, यंत्रणा आणि दक्षतेची भूमिका याविषयी सादरीकरण केले. प्रमुख वक्ते, अमोल तांबे यांनी पोलीस विभागातील त्यांचा अनुभव आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागा द्वारे राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दोन्ही अधिकाऱ्यांनी दक्षतेबाबत तसेच भ्रष्टाचारविरोधात एकत्रितपणे काम करण्याबद्दल श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
पुणे विभागातील 150 हून अधिक टपाल कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या संधीचा लाभ घेत कार्यशाळेला हजेरी लावली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पुणे विभागातर्फे सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
***
M.Iyengar/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1974709)
Visitor Counter : 111