अणुऊर्जा विभाग
केंद्रीय अणुउर्जा विभागात विशेष मोहीम 3.0 ची वेगवान अंमलबजावणी
Posted On:
03 NOV 2023 11:40AM by PIB Mumbai
केंद्रीय अणुउर्जा विभागाने (डीएई) सचिवालय तसेच डीएईच्या आधिपत्याखालील सर्व घटक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच अनुदानित संस्थांच्या परिसरात विशेष मोहीम 3.0 ची जोमदार सुरुवात केली आहे. दिनांक 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीतील पूर्वतयारीच्या टप्प्यात डीएईने विविध उद्दिष्ट्ये निश्चित केली आणि सर्व घटक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच अनुदानित संस्थांना विशेष मोहीम 3.0 लागू करण्याच्या दृष्टीने चालना दिली.
मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून विभागाच्या विविध एककांमध्ये नोंदींसाठी विहित कक्षांचे परीक्षण करण्यात आले. डीएईच्या आधिपत्याखालील सर्व घटक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच अनुदानित संस्था विशेष मोहीम 3.0 मध्ये सक्रियतेने सहभागी होत आहेत.
विभागाने सुमारे 64 स्वच्छता अभियानांच्या अंमलबजावणीतून 61128 फायलींचे पुनरावलोकन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या विशेष मोहीम 3.0 दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये स्वच्छता अभियाने तसेच जनजागृती कार्यक्रम राबवण्यावर आणि टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीतून महसूल मिळवण्यासोबतच कार्यालयांमधील जागा मोकळी करून घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
विशेष मोहीम 3.0 राबवताना नव्या आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकारा करण्यासाठी अणुउर्जा विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आपल्याला अधिक स्वच्छ आणि हरित वातावरण उपलब्ध होईल याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी विभागाने हे विशेष उपक्रम हाती घेतले आहेत.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974515)
Visitor Counter : 65