शिक्षण मंत्रालय
आयआयएम शिलॉंगकडून मुंबईत दुसऱ्या CXO गोलमेज बैठकीचे आणि भागधारकांच्या बैठकीचे आयोजन : शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यातील सेतू
Posted On:
31 OCT 2023 9:10PM by PIB Mumbai
मुंबई, 31 ऑक्टोबर 2023
आयआयएम शिलॉंगने मुंबईत दुसऱ्या CXO गोलमेज बैठकीचे आयोजन केले होते. यात उद्योग क्षेत्रातील अग्रणी, शिक्षणतज्ज्ञ आणि भागधारकांचे एक प्रतिष्ठित पॅनल सहभागी झाले होते. या चर्चेतून उपस्थितांना नवी दिशा मिळाली. आयआयएम शिलाँगच्या व्यवस्थापन शिक्षण शाखेच्या 15 वर्षांनिमित्त शेकडो माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतल्याने मुंबईतील बैठक माजी विद्यार्थी समुदायाचे महत्त्व दर्शवणारी ठरली.
आयआयएम शिलाँगचे संचालक प्रा. डी. पी. गोयल यांनी सर्व सहभागींचे आणि पॅनेलच्या सदस्यांचे स्वागत केले आणि आयआयएम शिलाँगच्या 15 वर्षांच्या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. आपल्या भाषणात प्रा. डी.पी. गोयल यांनी अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन पद्धती आणि अध्यापनशास्त्र यासंबंधी कॉर्पोरेट अग्रणींकडून अंतर्दृष्टीची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली. शिक्षणात जागतिक प्रतिमान बदल लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्य, अध्यापन पद्धत आणि मूल्यमापन प्रक्रियांमध्ये मोठे परिवर्तन होण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्राध्यापक गोयल यांनी शैक्षणिक पद्धतींमध्ये आवश्यक बदल ओळखण्यासाठी आणि अंतर्भूत करण्यासाठी उद्योगातील अग्रणींकडून ते जाणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
गोलमेज बैठकीचे उद्घाटन करताना, आयआयएम शिलाँगच्या संचालक मंडळाचे सदस्य अतुल कुलकर्णी यांनी आयआयएम शिलाँगच्या शैक्षणिक प्रगतीबाबत विश्वास बाळगणाऱ्या उद्योग भागीदारांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी संस्थेची वचनबद्धता व्यक्त केली. कुलकर्णी यांनी अलीकडच्या काळात हाती घेतलेल्या अनेक उल्लेखनीय उपक्रमांवर प्रकाश टाकला. या उपक्रमांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठेचा विशेष उपक्रम, वैभव शिखर परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळालेल्या केवळ तीन व्यवस्थापन संस्थांपैकी आयआयएम शिलाँग ही संस्थां होती. ईशान्य क्षेत्रासाठी आयआयएम शिलाँगची महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांसाठी योगदान देण्याची त्याची क्षमता, याविषयी कुलकर्णी यांनी सांगितले. तवांगमधल्या उपकेंद्रासह विविध राज्य सरकारांसोबत असलेल्या संस्थेच्या समन्वयाचा त्यांनी उल्लेख केला. या सर्व प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्यांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उद्योग-शैक्षणिक संलग्नता बळकट करण्यावर सर्वोच्च लक्ष केंद्रित केले आणि आणि आयआयएम सारख्या संस्थांनी त्यांचे पदवीधर उद्योगासाठी सज्ज आहेत हे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे यांसारख्या क्षेत्रांवर तज्ञ गटाने चर्चा केली. नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि गुंतवणूक बँकिंगचे प्रमुख अमित थवानी यांनी नवीन कंपन्यांनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील जटिल अभियांत्रिकी समस्या सोडवून उच्च ईबीआयटीडीए मार्जिन मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी योग्य माहिती संदर्भ विकसित करण्यात समुदायाच्या भूमिकेवर भर दिला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या अभ्यासादरम्यान मूल्य निर्मिती करण्यासाठी उद्योगात अधिक कार्यरत राहण्याची सूचना केली.
महत्वाच्या अडथळ्यांवर मात करण्याच्या दृष्टीने संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याची गरज तज्ज्ञ गटाने अधोरेखित केली. टाटा पॉवर कंपनी लिमिटेड मधील धोरणात्मक मनुष्यबळ अधिकारी आणि ऑर्गनायझेशन इफेक्टिवनेसचे प्रमुख कुंजविहारी जांध्याला यांनी तंत्रज्ञान आणि शाश्वतता हे परिवर्तनाचे दोन प्राथमिक संवाहक म्हणून अधोरेखित केले , वेगाने बदलणार्या गतिमान बाजार प्रतिसादात विद्यार्थी आणि कर्मचारी या दोघांच्या सतत माहिती अद्ययावत करण्यावर भर दिला. कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज जैन यांनी रोजगाराच्या सर्व स्तरांवर तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नावीन्यपूर्णतेच्या महत्त्वावर भर दिला तसेच विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या थेट प्रकल्पांना समर्थन दिले.
कमिन्स इंडियाचे उपाध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी अजय पाटील यांनी उत्कृष्ट कल्पना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सांघिक भावना आणि भक्कम व्यवस्थेची आवश्यकता अधोरेखित केली. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे कॉर्पोरेट व्यवसायाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रमुख यांनी अमरनाथ सक्सेना यांनी अधिक कुशल कर्मचारी निर्माण करण्यासाठी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. शिस्त, अनुकूलता, नीतिमत्तेशी बांधिलकी, व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची इच्छा आणि ग्राहकांना मूल्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे गुण भावी कर्मचार्यांसाठी महत्त्वाचे गुण असतील हे पॅनलमधील उपस्थितांनी अधोरेखित केले.
दुसरी आयआयएम शिलाँग प्रमुख अनुभवी अधिकाऱ्यांची गोलमेज बैठक ही महत्वाची ठरली या बैठकीच्या माध्यमातून उद्योगातील कौशल्य आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या क्षेत्राला यशस्वीरित्या जोडले गेले. हा एक समृद्ध करणारा अनुभव होता ज्याने व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या भविष्याला आकार देण्यासाठी शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील सतत सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आयआयएम शिलाँग ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आणि संपूर्ण ईशान्येकडील प्रदेशातील एकमेव आयआयएम , 2008 मध्ये स्थापन करण्यात आली आणि "पुन्हा जोडले जा, प्रतिबिंबित व्हा आणि पुन्हा कल्पना करा" या संकल्पनेसह संस्थेचा उत्कृष्टतेसाठी आपली 15 वर्षे अतूट बांधिलकी साजरी करण्याचा मानस आहे.
* * *
PIB Mumbai | S.Patil/Sonali K/Sonal C/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973566)
Visitor Counter : 75