वस्त्रोद्योग मंत्रालय
स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सवाचे आयोजन
Posted On:
31 OCT 2023 5:56PM by PIB Mumbai
गोवा, 31 ऑक्टोबर 2023
शिरोडा, पोंडा येथील केटीसी बस स्थानक येथे विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयातर्फे जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसीय मिनी प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन गोव्याचे जलसंपदा विकास मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते 29 ऑक्टोबर 2023 रोजी झाले . केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत हस्तकला सादरीकरण आणि जागरूकता कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम आयोजित केला जात आहे.

स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणे आणि "आत्मनिर्भर भारत" किंवा स्वयंपूर्ण भारताची भावना वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सव दक्षिण गोव्यातील शिरोडा मधील कारागिरांना त्यांची असाधारण कारागिरी आणि कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल. हँड एम्ब्रॉयडरी आणि क्रोशे , दागिने, चित्रे, नारळ, टेराकोटा आणि बरेच काही या हस्तकला प्रदर्शनात असून विक्रीसाठी उपलब्ध असतील. अभ्यागत थेट प्रात्यक्षिके देखील पाहता येतील, परस्पर संवाद साधता येईल. स्थानिक कलाकुसरींना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी, पारंपरिक कौशल्ये आणि सर्जनशीलतेच्या या उत्सवात कारागीर तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
B4VI.jpeg)
जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सव हा दक्षिण गोव्याचा समृद्ध वारसा दाखवणारा संस्कृती, कला आणि वाणिज्य महोत्सव आहे. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहील.
* * *
PIB Panaji | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1973446)
Visitor Counter : 90