रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना देशाच्या तसेच समाजाच्या प्रति सेवा समर्पणाचा भाव ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुत करण्यासाठी काम करावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे 10 व्या रोजगार मेळाव्यात  आवाहन

Posted On: 28 OCT 2023 7:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्यानं भरती झालेल्या 51 हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचं वाटप दूरस्थ पद्धतीने केले.

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तसंच राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या जागांसाठी ही भरती होत असून हा 10 वा रोजगार मेळावा होता यात बहुतांश नोकऱ्या रेल्वे विभागातील आहेत. देशभरात 37 ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते  याप्रसंग़ी उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन बघितले.

नागपूरच्या डॉ . वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना देशाच्या तसेच समाजाच्या प्रति सेवा समर्पणाचा भाव ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुत करण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.

वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण सुद्धा आवश्यक आहे असे सांगून शासकीय कर्मचारी हे लोकांना कशी सेवा देतात , त्याचा कसा सकारात्मक परिणाम होतो हे देखील पाहणे आवश्यक आहे असे गडकरी यांनी सांगितले.

याप्रसंगी मध्य रेल्वे नागपूरचे सहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी.एस . खैरकर यांनी या रोजगार मेळाव्यातून 104 नवनियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान केले  आहेत . आतापर्यंत झालेल्या रोजगार मेळाव्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने 500 पेक्षा जास्त शासकीय नोकऱ्या  दिल्या असल्याची माहिती  दिली. या नवनियुक्त उमेदवारांना रेल्वे,डाक विभाग, आयकर विभाग, जवाहर नवोदय विद्यालय याठिकाणी नोकरी मिळाली असून काही निवडक उमेदवारांना  नियुक्ती पत्राचे  वितरण ग़डकरींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुपेश चांदेकर यांनी  केले.

***

S.Rai/D.Wankhede/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972620) Visitor Counter : 81


Read this release in: English