सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नेहरू विज्ञान केंद्रामध्‍ये 28 -29 ऑक्टोबरला मेटॅलियन्स 2023: मुखाव्दारे घेण्‍याची औषधे , रेडिओलॉजी, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्‍यासाठी 18 वी आंतरराष्ट्रीय परिषद

Posted On: 26 OCT 2023 6:43PM by PIB Mumbai

मुंबई, 26 ऑक्टोबर 2023

मुंबईत वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात 28-29 ऑक्टोबर 2023 दरम्यान, मेटॅलियन्स 2023 ही ओरल मेडिसिन म्हणजेच मुखाव्दारे घेण्‍याची औषधे रेडिओलॉजी म्हणजेच किरणोत्सर्गाचे शास्त्र  आणि पर्यावरण तसेच  सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अलीकडच्या काळातील प्रगती या विषयावरील 18 वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे. या प्रतिष्ठित परिषदेच्या माध्यमातून, ओरल मेडिसिन, रेडिओलॉजी, आणि पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गंभीर समस्यांच्या उपायांवर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील आघाडीचे तज्ञ, विद्वान आणि संशोधक एकत्र येतील.   

अमेरिकेच्या मॉर्गन स्टेट विद्यापीठाचे  डीन प्रा. डॉ. पॉल त्चौनवू या परिषदेचे उद्घाटन करतील, तसेच मागील मेटॅलियन्स परिषदेच्या कार्यवाहीबाबत सर्वसमावेशक माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन होईल. मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंतवैद्यकीय रुग्णालयामधील प्रा. डॉ. सुनाली खन्ना, मेटॅलियन्स 2023 चे अध्यक्षपद भूषवतील, तर नवी दिल्ली येथील CSIR मुख्यालयाचे प्रा.डॉ. राकेश कुमार, परिषदेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. ही परिषद एक गतिशील आणि माहितीपूर्ण कार्यक्रम असून, या क्षेत्रापुढील  सध्याच्या महत्त्वाच्या समस्यांची हाताळणी करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन, नवोन्मेष आणि व्यावहारिक उपाय शोधण्यावर यावेळी भर दिला जाईल.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने नेहरू विज्ञान केंद्राद्वारे मेटॅलियन्स 2023 चे आयोजन करण्यात आले असून, ओरल मेडिसिन, रेडिओलॉजी, आणि पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना जागतिक स्तरावर पुढे नेण्याच्या अंतिम ध्येयासह, या महत्वाच्या क्षेत्रांमधील सहयोग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नवोन्मेशी  विचारांना चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे.

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971622) Visitor Counter : 114


Read this release in: English