संरक्षण मंत्रालय
गोवा सागरी परिषद (जीएमसी ) – 2023: 'सागरी उपयुक्ततेसंदर्भात विचारमंथनासाठी ' भारतीय नौदलाचा आऊटरिच उपक्रम
Posted On:
25 OCT 2023 8:00PM by PIB Mumbai
गोवा, 25 ऑक्टोबर 2023
भारतीय नौदलाच्या वतीने चौथी गोवा सागरी परिषद (जीएमसी ) - 29 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान गोवा येथील नेव्हल वॉर कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. जीएमसी हा भारतीय नौदलाचा आउटरीच उपक्रम असून परिणामकारक सागरी उपयुक्ततेसंदर्भात विचारमंथन करण्याच्या दृष्टीने, सागरी सुरक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांच्या सामूहिक ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी एक बहुराष्ट्रीय व्यासपीठ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदान केले जाते.
यंदाच्या गोवा सागरी परिषदेची संकल्पना "हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा: सामायिक सागरी प्राधान्यांचे रूपांतर सहयोगात्मक शमन आराखड्यामध्ये करणे", ही आहे. हिंद महासागर क्षेत्रामध्ये सागरी सुरक्षा साध्य करण्यासाठी सागरी क्षेत्रामध्ये 'सहकार्य आणि सहयोगी प्रयत्नांची' गरज लक्षात घेऊन यंदाच्या परिषदेची ही संकल्पना आहे. गोवा सागरी परिषद -23 मध्ये, भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल हरी कुमार हे बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या 12 हिंद महासागराची संबंधित किनारी देशांचे नौदलाचे प्रमुख / सागरी दलांचे प्रमुख / वरिष्ठ प्रतिनिधी यांचे यजमानपद भूषवणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते गोवा सागरी परिषद -23 मध्ये मुख्य भाषण करणार आहेत.
परिषदेच्या चार सत्रांमध्ये प्रख्यात वक्ते आणि विषय तज्ञ यांच्याशी सहभागींना संवाद साधता येईल. ही सत्रे पुढीलप्रमाणे असणार आहेत.
- हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा साध्य करण्यासाठी नियामक आणि कायदेशीर चौकटीतील त्रुटी ओळखणे
- सागरी धोके आणि आव्हाने एकत्रितपणे कमी करण्यासाठी जीएमसी राष्ट्रांसाठी सामान्य बहु-पक्षीय सागरी धोरण आणि परिचालन नियम तयार करणे
- हिंद महासागर क्षेत्रात उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसह सहयोगी प्रशिक्षण कार्यक्रमांची निश्चिती
- हिंद महासागर क्षेत्रातील विद्यमान बहुपक्षीय संस्थांद्वारे सामूहिक सागरी क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने सुरू केलेल्या उपक्रमांचा लाभ”
परिषदेचा एक भाग म्हणून, भेट देणाऱ्या मान्यवरांना “मेक इन इंडिया प्रदर्शनामध्ये भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाचे साक्षीदार होण्याची आणि स्वदेशी युद्धनौका तसेच खोल पाण्यातील बचावकार्यासाठी वापरण्यात येणारे जहाज (डीएसआरव्ही ) यांच्या सामर्थ्याचे साक्षीदार होण्याची संधी देखील दिली जाईल.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1971078)
Visitor Counter : 62