ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातील प्रादेशिक कार्यालयाकडून खुल्या बाजारात विक्री योजना (स्थानिक) अंतर्गत गव्हाची विक्री
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2023 6:22PM by PIB Mumbai
भारतीय अन्न महामंडळाच्या(एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यापासून(28 जून 2023) खुल्या बाजारात विक्री योजना(स्थानिक) अंतर्गत गव्हाच्या विक्रीचा प्रस्ताव सुरू केला आहे. गव्हाच्या साठ्याची खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या खरेदीदारांना एफसीआयच्या ई-लिलाव सेवा पुरवठादार “ एम जंक्शन सर्विसेस लिमिटेड” (https://www.valuejunction.in/fci/ ) वर स्वतःला सूचीबद्ध करता येईल आणि साठ्यासाठी बोली लावता येईल. ज्या खरेदीदाराला आपले नाव नोंदवायचे आहे अशा कोणत्याही पक्षासाठी पॅनेलमध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया 72 तासात पूर्ण होईल. प्रक्रियाकर्ते, पिठाच्या गिरण्या, गव्हाच्या उत्पादनांची निर्मिती करणारे या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र विभागात 25 डेपोंमधील 9000 एमटी गव्हाचा साठा आगामी 18-10-2023 च्या लिलावासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. खुल्या बाजारातील विक्री योजना(स्थानिक) मुळे भाववाढीला आळा बसेल आणि सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968560)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English