दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पणजी सब फॉरेन पोस्ट ऑफिसकडून नागरिकांसाठी सुविधा
Posted On:
16 OCT 2023 5:25PM by PIB Mumbai
गोवा, 16 ऑक्टोबर 2023
पणजी टपाल मुख्यालयातील पणजी सब फॉरेन पोस्ट ऑफिसने नागरिकांच्या सोयीसाठी सेवांमध्ये वृद्धी केली आहे आणि कामकाजाचे तास वाढवले आहेत. 16 ऑक्टोबर 2023 पासून, पणजी सब फॉरेन पोस्ट ऑफिस आता आठवड्यातील पाच दिवस, सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10:00 ते दुपारी 13:00 दरम्यान खुले राहील. कामकाजाच्या वेळेतील हा बदल नागरिकांना आणि गोवा भेटीवरील अभ्यागतांना आंतरराष्ट्रीय पोस्टल सेवांच्या विस्तृत सेवा पुरवेल. पणजी सब फॉरेन पोस्ट ऑफिस आता सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवा आणि मेल हाताळण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे.
पणजी टपाल मुख्यालयात 16 ऑक्टोबर 2023 पासून आधार अद्ययावतीकरण आणि नोंदणी सुविधा आणि पार्सल पॅकेजिंग सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पणजी मुख्यालयाशी संलग्न इमारतीतील या अतिरिक्त नागरिकांच्या सोयीसाठी कामकाजाचे तास सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच अशी करण्यात आली आहे.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1968164)
Visitor Counter : 72