अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

महिलांचा वापर करून, नव्या मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट महसूल गुप्तचर संचालनालयाने केले उघड

Posted On: 13 OCT 2023 8:30PM by PIB Mumbai

मुंबई, 13 ऑक्‍टोबर 2023

 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई शाखेने अत्यंत सावधगिरीने आखलेल्या कारवायांद्वारे, अमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. डीआरआय मुंबई शाखेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत, महिलांचा वापर करून, नवनवीन मार्गांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा तपास लावला आहे. यामध्ये परदेशी महिलांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड आणि गुदाशयामध्ये दडवून भारतात अमली पदार्थ आणले जात होते. यापूर्वी या टोळ्या सामानामध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी विविध कल्पक पद्धतींचा अवलंब करत होत्या.   

गेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत, डीआरआय मुंबई शाखेने तीन प्रवाशांकडून एकूण 568 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 5.68 कोटी रुपये इतकी आहे. सॅनिटरी पॅडमध्ये लपवून कोकेनची तास्कारी करणाऱ्या दोन महिला युगांडा इथल्या  होत्या. तिसरी प्रवासी महिला टांझानिया येथील होती आणि तिने कोकेन असलेली कॅप्सूल गुदाशयामध्ये लपवून ठेवली होती. एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदी अंतर्गत, हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून तीनही महिला प्रवाशांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या कारवाई मधून, अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्कर टोळ्या अवलंबत असलेल्या नवनवीन पद्धती शोधून, समाजाचे अमली पदार्थांच्या विळख्यापासून रक्षण करण्यासाठी, एक अंमलबजावणी संस्था म्हणून डीआरआयचे समर्पण आणि व्यावसायिकता दिसून येते.

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967533) Visitor Counter : 85


Read this release in: English