दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल तिकीट संग्रह दिवस : महाराष्ट्र परिमंडळाच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल यांनी 'ऑगमेंटेड रिऍलिटी इन फिलॅटेली' या विषयावरील विशेष तिकिटाचे केले प्रकाशन
Posted On:
11 OCT 2023 9:50PM by PIB Mumbai
मुंबई, 11 ऑक्टोबर 2023
राष्ट्रीय टपाल सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून आज मुंबईत टपाल विभागाने फिलॅटेली अर्थात टपाल तिकीट संग्रह दिवस साजरा केला. महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के. के. शर्मा यांनी 'ऑगमेंटेड रिऍलिटी इन फिलॅटेली' या विषयावरील विशेष तिकिटाचे प्रकाशन केले. टपाल विभागाच्या नवोन्मेषाचे प्रतीक असलेल्या पोस्टकार्डचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. फिलॅटेली जगताला यातून नवा आयाम प्राप्त होतो.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2023-10-11at8.32.45PMH3E5.jpeg)
आपल्या देशातील उल्लेखनीय वास्तुकलेचा नमुना असलेल्या महाराष्ट्रातील पायऱ्या असलेल्या विहिरी दर्शवणाऱ्या लिफाफ्याचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 'डिस्कव्हर इंडिया विथ फिलॅटेली'या घोषवाक्याचे अनावरण झाले. मुंबई जीपीओवर आजच्या दिवसापुरते (11 ऑक्टोबर 2023)हे उपलब्ध होते.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2023-10-11at8.32.45PM(1)NRC9.jpeg)
फिलॅटेलीची जागतिक आवड लक्षात घेऊन, पोस्टकार्डच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी विशेष पोस्टकार्डचे प्रकाशन करण्यात आले.
अमिताभ सिंह , पोस्टमास्टर जनरल, पत्र आणि बीडी; विजय कुमार, महाव्यवस्थापक, वित्त; मनोज कुमार, संचालक पत्र आणि बीडी. अभिजीत बनसोडे, संचालक (मुख्यालय); अजिंक्य काळे, संचालक, मुंबई विभाग; यावेळी मान्यवर फिलॅटेली (टपाल तिकीट ) संग्राहक, पोस्ट क्रॉसर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2023-10-11at8.32.46PMK0RP.jpeg)
कार्यक्रमाची सांगता पोस्ट क्रॉसर्सच्या भेटीने झाली. यामुळे पोस्टकार्ड संग्रहाची आवड असलेल्यांना आपल्या आवडीविषयी कथन करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. प्रकाशने मुंबई फिलॅटेली विभाग आणि महाराष्ट्र परिक्षेत्राच्या इतर फिलॅटेली विभागात लवकरच उपलब्ध केली जातील.
टपाल विभाग 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहे.
N.Chitale/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966855)
Visitor Counter : 132