वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या   विदेश व्यापार अतिरिक्त महासंचालनालय डीजीएफटीद्वारे एक दिवसीय  ‘आंतरराष्ट्रीय फार्म टेक समिट 2023’चे 11 ऑक्टोबर रोजी आयोजन

Posted On: 10 OCT 2023 8:10PM by PIB Mumbai

 

नागपूर, 10 ऑक्टोबर 2023

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत नागपूरचे  विदेश व्यापार अतिरिक्त महासंचालनालय (डीजीएफटी) इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (ICIB), मिहान- विशेष आर्थिक क्षेत्र, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि रोटरी क्लब अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमान रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आंतरराष्ट्रीय फार्म टेक समिट 2023’ चे आयोजन  11 ऑक्टोबर  बुधवार रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत करण्यात आले आहे. याप्रसंगी सिंगापूरचे  महावाणिज्यदूत   चेओंग मिंग फूंग आणि अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत   झाकिया वारदक हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर श्रीमती मिताली सेठी संचालक  वनामती, सौम्या शर्मा  मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, नागपूर, . श्रमण वासिरेड्डी, डीसी-मिहान सेझ आणि अतिरिक्त. डीजीएफटी आरए नागपूर, स्नेहल ढोके, सहाय्यक डीजीएफटीपी. एम. पार्लेवार,संचालक, एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट नागपूरडॉहेही प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. बी.सी. भरतिया, राष्ट्रीय अध्यक्ष - CAIT,   राजन ठवकरउपाध्यक्ष पश्चिम विभाग –, ICIB,  राजीव वरभे, अध्यक्ष - रोटरी क्लब ऑफ नागपूर साउथ ईस्ट जे या समिटचे आयोजक आहेत हे देखील या समिटला उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था   अथवा कंपनी तसेच  अन्न प्रक्रिया युनिट्स आणि संबंधित उद्योग  या ग्लोबल व्हिलेजमध्ये जोडलेल्या घटकांना  शाश्वत भविष्याकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी सहयोग ही या  एक दिवसीय परिषदेची मुख्य संकल्पना   आहे.या  संकल्पनेस पाठिंबा देण्यासाठी कृषी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक, सहयोग आणि भागीदारी यावरील संधी शोधण्यावर या  परिषदे दरम्यान भर देण्यात येणार आहे.

***

D.Wankhede/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966425) Visitor Counter : 95


Read this release in: English