पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेडच्या चॅनेल पार्टनर मीटचे उद्घाटन
Posted On:
09 OCT 2023 7:57PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत पीएसई आणि स्पेशालिटी ग्रीस अँड ल्युब्रिकेंट्समधील मार्केट लीडर असलेल्या बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेडच्या चॅनेल पार्टनर्स मीटचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज गोव्यातील ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाले. चॅनल पार्टनर्स मीटमध्ये या क्षेत्रातील उद्योजक, भागधारक आणि चॅनेल भागीदार एकत्र आले. हे सहकार्य वाढविण्यासाठी, अंतर्दृष्टी सामायिक करण्यासाठी आणि गतिशील लुब्रिकंट (वंगण) बाजारात वाढीच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य केले.
पेट्रोलियम आणि ल्युब्रिकेंटस उद्योगातील भागीदारीला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी अधोरेखित केले. देशाच्या आर्थिक विकासात लुब्रिकेंट्स उद्योगाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. भारताच्या ऊर्जा सुरक्षेत योगदान देणाऱ्या नावीन्यपूर्ण, गुणवत्ता आणि शाश्वततेसाठी बामर लॉरी यांच्या समर्पणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले.
भागधारक बैठकीत (चॅनेल पार्टनर्स मीट) मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचे संचालक आर. एम. उथयराजा यांनी संबोधित केले. त्यांनी लुब्रिकेंट तंत्रज्ञानातील कंपनीच्या अद्ययावत प्रगती, उत्पादन उत्कृष्टता आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठीच्या वचनबद्धतेबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी सामायिक केली. बामर लॉरीच्या निरंतर यशात अढळ पाठिंबा आणि भूमिकेबद्दल संचालकांनी भागीदारांचे आभार मानले.
यावेळी बोलताना ग्रीस अँड ल्युब्रिकेंट्सचे सीओओ राज मैती म्हणाले, "गोव्यातील या चॅनेल पार्टनर्स मीटमध्ये आमच्या चॅनेल पार्टनर्स, भागधारक आणि इंडस्ट्री तज्ञांनी दाखवलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि उत्साहाने आम्हाला आनंद झाला आहे. ही घटना कायमस्वरूपी भागीदारी निर्माण करणे, नाविन्यपूर्ण करणे आणि भारतातील लुब्रिकेंट्स उद्योगाच्या वाढीस हातभार लावण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रसंगी उपस्थित राहून सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल संचालकांनी त्यांचे आभार मानले.
चॅनेल पार्टनर्स मीट, नियमितपणे आयोजित केली जाते. कोविड-19 महामारीमुळे मोठ्या खंडानंतर या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान बामर लॉरीच्या एसबीयू: ग्रीस अँड ल्युब्रिकेंट्सने एलिट मॅक्स - सीके 4 डिझेल इंजिन ऑईल आणि किंमत स्पर्धात्मक ग्रीस आणि हायड्रॉलिक ऑईलसह मोटारसायकल ऑईल रेस 4 टी प्लस सह नवीन फॉर्म्युलेशनसह चार नवीन उत्पादने बाजारात सादर केली.
या कार्यक्रमातील उपस्थितांना माहितीपूर्ण सत्रं, पॅनेल चर्चा आणि नेटवर्किंगच्या संधींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यामुळे लुब्रिकेंट्स उद्योगाच्या विकसनशील व्याप्तीची त्यांना माहिती होईल. तसेच बामर लॉरी कंपनीकडून नवीनतम उत्पादन ऑफर आणि निराकरणे शोधण्याची संधी देखील या बैठकीच्या निमित्ताने मिळाली. बामर लॉरीच्या वाढीत आणि यशात चॅनेल भागीदारांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत चॅनेल पार्टनर्स बैठकीचा मेजवानी आणि पुरस्कार सोहळ्याने झाला. बामर लॉरी उद्योगांना ऊर्जा देणारे, शाश्वततेस प्रोत्साहन देणारे आणि प्रगती चालवणारे उच्च-गुणवत्तेचे लुब्रिकंट प्रदान करण्याच्या आपल्या ध्येयासाठी वचनबद्ध आहे.
बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेड बद्दल:
बामर लॉरी हा भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत मिनीरत्न-1 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. भारत आणि परदेशात चार संयुक्त उपक्रम आणि एका उपकंपनीसह, आज हा उत्पादन आणि सेवा दोन्ही क्षेत्रांमध्ये उपस्थिती सह एक अत्यंत आदरणीय आंतरराष्ट्रीय वैविध्यपूर्ण समूह आहे. इंडस्ट्रियल पॅकेजिंग, ग्रीस अँड ल्युब्रिकेंट्स, केमिकल्स, ट्रॅव्हल अँड व्हेकेशन्स, लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स सर्व्हिसेस, कोल्ड चेन आणि रिफायनरी अँड ऑईल फिल्ड सर्व्हिसेस अशी आठ व्यवसाय युनिट्सची कार्यालये देश-विदेशात आहेत.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1966112)
Visitor Counter : 81