श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाण मजूरांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्ती

Posted On: 09 OCT 2023 4:09PM by PIB Mumbai

पणजी, 9 ऑक्टोबर 2023

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने महाराष्ट्र आणि गोवा राज्य, तसेच दादरा, नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील खाण कामगारांच्या पाल्यांसाठी असलेल्या शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी अर्ज मागवले आहेत.  

https://scholarships.gov.in या राष्ट्रीय स्कॉलरशिप पोर्टलवर वाढीव शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.विडी कामगार, चूना आणि डोलोमाईट, लोह-मँगनीज खाणीतील मजुरांच्या पाल्यांसाठी पहिली ते चौथी 1,000 रुपये, पाचवी- आठवी 1500 रुपये, इयत्ता नववी-दहावीसाठी 2,000 रुपये, अकरावी-बारावीसाठी 3,000 रुपये, आयटीआय, पॉलिटेक्निक, बी एस्सी कृषीसह इतर पदवीसाठी 6,000 रुपये आणि बी.ई., एमबीबीएस, एमबीएसाठी 25,000 रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल. पूर्व-मॅट्रिक साठीच्या ऑनलाईन अर्जासाठी 30 नोव्हेंबर आणि दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठीच्या (पोस्ट मॅट्रीक) ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे.

ऑनलाईन अर्जातील अडचणी, शिष्यवृत्तीसंबंधी सविस्तर माहितीसाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नागपूर कल्याण आयुक्तालयात 0712-2510200  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा wcngp-labour[at]nic[dot]in या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.  

SRT/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 


(Release ID: 1965962) Visitor Counter : 91


Read this release in: English