नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल सोमवारी भारतातील सर्वात मोठा सागरीक्षेत्र कार्यक्रम : जीएमआयएस 2023 संदर्भात प्रसार माध्यमांना करतील संबोधित

Posted On: 08 OCT 2023 6:43PM by PIB Mumbai

 

जीएमआयएस, ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 :

  • 70 हून अधिक देशांचा सहभाग.
  • 250 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारांची उपस्थिती.
  • 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शक राहणार उपस्थित.
  •  400 हून अधिक परदेशी प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार लावणार हजेरी.

मुंबई, ऑक्टोबर 2022

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, सोमवारी (09 ऑक्टोबर 2023) मुंबईत एमएमआरडीए मैदानावर प्रसार माध्यमांना संबोधित करतील.  मुंबईत 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आगामी ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 च्या पार्श्वभूमी  याचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक आणि प्रादेशिक भागीदारी आणि गुंतवणुकीला चालना देऊन भारतीय सागरी अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे हे तिसऱ्या  जीएमआयएसचे  उद्दिष्ट आहे. विशेष उद्योग भागीदार म्हणून भारतीय बंदरे संघटना (IPA) आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आयोजित जीएमआयएस 2023 ही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी समुदायासाठी एकत्र येण्याचे व्यासपीठ म्हणून परिकल्पित आहे.   हा कार्यक्रम जागतिक सागरी व्यावसायिक, धोरणकर्ते, नियामक आणि अनेक मंचांवरील प्रमुख नेत्यांना एकत्र आणेल.

गेल्या दोन महिन्यांत, मंत्रालयाने जागरूकता वाढवणे तसेच गुंतवणूकदार आणि भागधारकांना आकर्षित करणे या उद्देशाने एक व्यापक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पोहोच कार्यक्रम राबवला आहे.  अपेक्षा उंचावणाऱ्या या कार्यक्रमात 40 पेक्षा जास्त देश अधिकृतपणे सहभागी होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, 10 देशांचे मंत्री या शिखर परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.

या कार्यक्रमात सुमारे 150 हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनामध्ये सरकारी संस्थांसोबत देशांतर्गत आणि जागतिक कंपन्यांचा समावेश आहे.  कार्यक्रमात सुमारे 50000 हून अधिक अभ्यागत आणि प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

प्रसार माध्यमांबरोबरच्या या संवाद कार्यक्रमात बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांच्यासह मुंबई बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, भारतीय जहाजबांधणी महामंडळ आणि डी जी शिपिंगचे वरिष्ठ अधिकारी देखील  उपस्थित राहणार आहेत.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965810) Visitor Counter : 113


Read this release in: English